News Flash

Happy Birthday Shaan : जाणून घ्या, शानविषयी ‘या’ खास गोष्टी

शानचं खरं नाव शंतनु मुखर्जी असं असून त्याने वयाच्या १७ व्या वर्षापासूनच आपल्या करिअरला सुरुवात केली.

लोकप्रिय गायक शान

आपल्या सुमधूर आवाजामुळे प्रत्येक श्रोत्याच्या मनाचा ठाव घेणार गायक शान साऱ्यांनाच ठाऊक असेल. याच शानचा आज ४६ वा वाढदिवस. गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये कमी वावरणारा शान आजही लोकप्रिय गायकांच्या यादीमध्ये अग्रस्थानावर आहे. बॉलिवूडमध्ये एकाहून एक सुपरहिट गाण्यांना आपला आवाज देणारा शान आजही श्रोत्यांच्या मनावर राज्य करत आहे.

रोमॅण्टीक गाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शानचं खरं नाव शंतनु मुखर्जी असं असून त्याने वयाच्या १७ व्या वर्षापासूनच आपल्या करिअरला सुरुवात केली. शानला त्याच्या कुटुंबाकडूनच संगीताचा वारसा लाभला. शानचे वडील मानस मुखर्जीदेखील एक संगीतकार होते. तर शानची बहीण सागरिका देखील बॉलिवूडमध्ये एक नावाजलेली गायिका म्हणून ओळखली जाते. विशेष म्हणजे शानच्या वडीलांच निधन झाल्यानंतर त्याची ही जागा शानच्या आईने चालविली. त्याच्या आईने मानसी यांनी पतीच्या निधनानंतर  एक गायिका म्हणून काम केलं आणि कुटुंबाची जबाबदारी पार पाडली.

वडीलांच्या निधनामुळे शानने घरची जबाबदारी उचलण्याच्या हेतूने १७ व्या वर्षीची काम करण्यास सुरुवात केली. शानने सुरुवातीला जाहिरातींसाठी जिंगल्स करत असले त्यानंतर त्याने हळूहळू चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. या प्रवासामध्ये त्याने हिंदीखेरीज अनेक भाषांमध्ये गाणी गायली. त्यात प्रामुख्याने कन्नड, हिंदी, बंगाली, मराठी, उर्दू या भाषांचा समावेश आहे.  तसंच संगीत क्षेत्रात त्याने दिलेल्या या योगदानामुळे त्याला  सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनासाठी फिल्मफेअरचा पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे.

दरम्यान,  शानने गाण्याव्यतिरिक्त ‘सारेगामापा’, ‘सारेगामापा- लिटिल चॅम्प्स’, ‘स्टार वॉइस ऑफ इंडिया’सारख्या म्यूझिक रिअॅलिटी शोसुध्दा केले आहेत. ‘स्टार वॉइस ऑफ इंडिया ‘या लोकप्रिय शोचे सूत्रसंचालनदेखील केलं आहे. शानने २००० मध्ये त्याची प्रेयसी राधिकासोबत लग्न केलं असून त्यांना सोहम व शुभ अशी दोन मुले आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2018 10:06 am

Web Title: happy birthday shaan life story of singer shaan
Next Stories
1 लहान मुलांसाठी ‘हे’ आहे सलमानचं नवं गिफ्ट
2 लुकलुकती गोष्ट!
3 ज्येष्ठांची वेबवाट
Just Now!
X