07 March 2021

News Flash

love story : …म्हणून शर्मिला टागोर यांना मंसूर अली खान यांनी दिला होता रेफ्रिजरेटर

प्रेमासाठी वाट्टेल ते! शर्मिला यांना इंप्रेस करणं काही सोपं नव्हतं, पण...

मनमोहक सौंदर्य आणि अदाकारीमुळे एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे शर्मिला टागोर. आरस्पानी सौंदर्या व अभिनयाच्या जोरावर शर्मिला टागोर यांनी ६०-७० चा काळ चांगलाच गाजवला. त्यामुळे आजही त्यांचा अफाट मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. एकेकाळी अनेकांच्या मनावर राज्य करणाऱ्या शर्मिला टागोर आणि मंसूर अली खान यांची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावी इतकीच रंजक आहे. त्यामुळे आज शर्मिला यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची लव्हस्टोरी जाणून घेऊ.

‘कश्मीर की कली’ या चित्रपटामुळे शर्मिला टागोर रातोरात सुपरस्टार झाल्या. त्याकाळी त्यांचे असंख्य चाहते होते. या चाहत्यांमध्ये मंसूर अली खान यांचादेखील समावेश होता. कोलकाता येथे झालेल्या एका पार्टीमध्ये मंसूर अली खान यांनी शर्मिला टागोर यांना पाहिलं आणि पाहताच क्षणी ते त्यांच्या प्रेमात पडले. विशेष म्हणजे शर्मिला यांना इंप्रेस करणं काही सोपं नव्हतं. यासाठी मंसूर अली खान यांना अनेक प्रयत्न करावे लागले. त्यांच्या या लव्हस्टोरीमध्ये सगळ्यात चर्चेत राहिलेला किस्सा म्हणजे मंसूर अली खान यांनी शर्मिला टागोर यांना भेट दिलेला रेफ्रिजरेटर.

त्याकाळी रेफ्रिजरेटर घेणं ही खूप मोठी बाब होती. त्यावेळी त्याची किंमतदेखील अफाट होती. मात्र, शर्मिला टागोर यांना इंप्रेस करण्यासाठी मंसूर अली खान यांनी त्यांना भेट म्हणून रेफ्रिजरेट दिला होता. त्याचबरोबर त्यांनी अनेक वेळा शर्मिला यांना फूलं आणि पत्रदेखील पाठवले होते. विशेष म्हणजे मंसूर अली खान यांचे प्रयत्न पाहून तब्बल ४ वर्षांनी शर्मिला यांनी त्यांचा होकार कळवला.

दरम्यान, शर्मिला टागोर यांच्या चित्रपटातील बोल्ड अंदाजामुळे पतौडी कुटुंबीय त्यांचा स्वीकार करणार नाहीत, अशी चर्चा त्याकाळी रंगली होती. मात्र, पतौडी कुटुंबाने शर्मिला आणि मंसूर अली खान यांचा थाटात विवाहसोहळा केला. इतकंच नाही तर शर्मिला यांनी त्यांचा धर्मपरिवर्तनदेखील केल्याचं सांगण्यात येतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 11:43 am

Web Title: happy birthday sharmila tagore sharmila tagore and nawab pataudis love story is very unique ssj 93
Next Stories
1 नीतू कपूर आणि वरून धवन पाठोपाठ क्रिती सेनॉनला करोनाची लागण
2 ‘बोलण्याआधी विचार का नाही केलास?’ सैफ अली खानवर संतापले मुकेश खन्ना
3 शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला प्रकाश राज यांचा पाठिंबा; म्हणाले…
Just Now!
X