News Flash

#HappyBirthdayVirat : अनुष्कानं मानले देवाचे आभार

विराटसाठी लांबलचक पोस्ट न लिहिता तिनं लिहिलेलं छोटसं वाक्य खूप काही सांगून गेलं.

विराट- अनुष्का

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याचा आज वाढदिवस. जगभरातील क्रिकेटप्रेमींकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. क्रिकेटविश्वातील अनेक खेळाडू तसेच बॉलिवूडमधल्या सेलिब्रिटींनीही विराटला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहे.

अनुष्कानं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर विराटसमवेत आपला फोटो पोस्ट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. पण या शुभेच्छा देताना तिनं देवाचे आभार मानले आहे. तो जन्मला म्हणून मी देवाचे आभार मानते असं लिहित तिनं विराटसोबतचा फोटो शेअर केला आहे. विराटसाठी लांबलचक पोस्ट न लिहिता तिनं लिहिलेलं  छोटसं वाक्य खूप काही सांगून गेलं. विराट कोहली सध्या वाढदिवस साजरा करण्यासाठी पत्नी अनुष्कासोबत उत्तराखंडमध्ये दाखल झाला आहे. सध्या विंडीजविरुद्ध टी-20 मालिकेत विराटला विश्रांती देण्यात आलेली आहे, या सुट्टीचा फायदा घेत सध्या उत्तराखंडाच्या निसर्गरम्य ठिकाणी ते दोघंही पोहचले आहेत. ते एका आश्रमात राहणार असल्याचं म्हटलं जात आहे.

विराटचा हा ३० वा वाढदिवस आहे. गेल्याच वर्षी विराट- अनुष्का विवाहबंधनात अडकले. बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातलं हे सर्वात प्रसिद्ध जोडपं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 1:49 pm

Web Title: happy birthday virat anushka sharma lovely posts for husband
Next Stories
1 दिवाळीच्या खरेदीसाठी सिद्धार्थ जाधवची नवी शक्कल
2 प्रियांकाचा ‘पाहुना’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
3 ‘भारत’मधील सर्वात जीवघेणा स्टंट साकारणार युपीमधील रायडर्स
Just Now!
X