20 February 2018

News Flash

कुणाल खेमूने शेअर केला आपल्या मुलीचा पहिला फोटो

२९ सप्टेंबरला ब्रीच कँडी रुग्णालयात सोहाने इनायाला जन्म दिला

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: November 15, 2017 9:54 AM

बॉलिवूडमधील हँडसम डॅडीच्या पंक्तीत नुकताच बसलेल्या कुणाल खेमूने बालदिनाचे औचित्य साधून सोशल मीडियावर आपल्या मुलीचा फोटो शेअर केला. मुलीचा फोटो शेअर करत त्याने सर्वांना बालदिनाच्या शुभेच्छाही दिल्या. या फोटोला कॅप्शन देताना कुणाल म्हणाला की, ‘सर्व मुलांना बालदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुमची निरागसता आम्हाला नेहमीच प्रेरणा देणारी ठरो. #हॅप्पीचिल्ड्रन्सडे.’

सोहा अली खानने २९ सप्टेंबरला इनायाला जन्म दिला. जिथे अधिकतर सेलिब्रिटी आपल्या मुलांना कॅमेऱ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात तिथे कुणाल आणि सोहाने आपल्या मुलीचा फोटो स्वेच्छेने सोशल मीडियावर शेअर केला. दोघंही सोशल मीडियावर फार सक्रिय असून ट्विटरच्या माध्यमातून कुणालने त्यांचा चाहत्यांना त्यांना कन्यारत्न झाल्याचे सांगितले होते.

२९ सप्टेंबरला मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात सोहाने इनायाला जन्म दिला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर सोहा आणि कुणालचा इनाया सोबतचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर सोहाने कुणाल आणि इनायाचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये कुणाल इनायासोबत काही निवांत क्षण घालवताना दिसत होता.

Bliss ❤️

A post shared by Soha (@sakpataudi) on

जुलै २०१४ मध्ये कुणालने पॅरिसमध्ये सोहाला प्रपोज केलं होतं. त्यानंतर जानेवारी २०१५ मध्ये दोघांनी लग्न केले. डिसेंबर महिन्यात तैमुरचा जन्म आणि सप्टेंबरमध्ये सोहाने दिलेल्या गुड न्यूजमुळे खान कुटुंबाचा आनंद द्विगुणीत झाला असेल यात काही शंका नाही. नुकताच कुणालने ‘गोलमाल अगेन’ या मल्टिस्टारर सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावली.

First Published on November 15, 2017 9:52 am

Web Title: happy children day from soha ali khan kunal kemmu wishes and social post a picture of daughter inaaya
  1. No Comments.