News Flash

Happy Father’s Day 2021: बॉलिवूडकर असा साजरा करत आहेत फादर्स डे; सोशल मीडियावर शेअर केले फोटोज

बॉलिवूडकरांनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या हटके अंदाजात त्यांच्या वडिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. जाणून घेऊयात बॉलिवूडकरांचा फादर्स डे...

आज जगभरात फादर्स डे साजरा करण्यात येतोय. आपल्या आयुष्यातील सगळ्यात पहिले हिरो बनलेल्या आपल्या वडिलांसाठी असलेल्या भावना व्यक्त करण्याचा दिवस. प्रत्येकांच्याच आयुष्यात त्यांच्या वडिलांची एक वेगळी भूमिका असते. फादर्स डे निमित्त सर्वचजण आपल्या वडिलांसाठी स्पेशल दिवस बनवता यावा म्हणून प्रयत्न करतात. मग यात बॉलिवूडकर कसे मागे राहतील. बॉलिवूडकरांनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या हटके अंदाजात त्यांच्या वडिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. जाणून घेऊयात बॉलिवूडकरांचा फादर्स डे…

हॅपी फादर्स डे डॅडी!

साऊथ सिनेमापासून बॉलिवूडपर्यंत आपली एक वेगळी ओळख तयार करणारी अभिनेत्री श्रुती हासनने वडिल कमल हासन यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केलाय. हा फोटो शेअर करताना तिने एक पोस्ट देखील लिहीली आहे. यात तिने लिहिलंय, “तुम्ही ज्या व्यक्तींकडून खूप शिकता आणि जे व्यक्ती कायम आपल्या चेहऱ्यावर कायम आनंद आणतात, ते व्यक्ती तुमचे आई-वडील असणं हे भाग्याचं आहे. हॅपी फादर्स डे ! तुम्ही माझे सगळ्यात लाडके पिता बनल्याबद्दल खूप खूप आभार.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Shruti Haasan (@shrutzhaasan)

 

सुनिल शेट्टीने मुलीसह शेअर केला फोटो

बॉलिवूडमध्ये ‘अण्णा’ नावाने ज्याला ओळखलं जातं तो अभिनेता सुनिल शेट्टीने सुद्धा आपल्या मुलीसोबतचा एक फोटो शेअर केलाय. सध्या सुनिल शेट्टी याची मुलगी अथिया शेट्टी बॉलीवुडमध्ये नशिब आजमावत आहे. सोशल मीडियावर मुलीसोबतचा फोटो शेअर करताना मुलीने सगळ्यात आधी अभिनय क्षेत्रात येण्याचा विचार सांगितला होता, त्यावेळचा अनुभव देखील शेअर केलाय. यात त्याने लिहिलंय, “मला आठवतंय, टीया माझ्याकडे आली आणि म्हणाली मला अभिनेत्री व्हायचंय. त्यावेळ आम्ही अमेरिकेत होतो. तिच्या शिक्षणासाठी आम्ही उत्तम कॉलेजेस शोधत होतो. तिच्या या निर्णयाने मला आनंद होणार नाही, असा समज तिने करून घेतला होता. पण माझ्यासाठी कायम तिचा आनंदच महत्त्वाचा आहे. तिच्या निर्णयाला माझा पाठिंबा असल्याचं कळल्यानंतर चेहऱ्यावर आनंद झळकला. मला तिचा कायम अभिमान वाटतो. ती माझी एक जवळची मैत्रिण बनलीय.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Suniel Shetty (@suniel.shetty)

 

आयशा श्रॉफने शेअर केला जुना फोटो

अभिनेते जॅकी श्रॉफ यांची मुलगी आयशा श्रॉफने तिच्या लहानपणीचा एक जुना फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये वडील जॅकी श्रॉफ आणि भाऊ टायगर श्रॉफ दिसून येत आहेत. फोटो शेअर करताना तिने लिहिलंय, “जगातल्या बेस्ट डॅडींना फादर्स डे च्या शुभेच्छा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayesha Shroff (@ayeshashroff)

नुकतंच गमावलेल्या वडिलांसाठी हिनाने लिहिली इमोशनल नोट

अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं. आपल्यापासून दूर गेलेल्या वडिलांसाठी हिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर करत इमोशनल नोट लिहिलीय. यात तिने लिहिलं, “आज फादर्स डे…२० जून…आज दोन महिने झाले पापा, आपण दोघांनी ७ महिन्यापूर्वी हा फोटो क्लिक केला होता. फोटो क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा फोटो दाखवला नाही, कारण खास दिवशी हा फोटो पोस्ट करायचा होता. पण तुम्ही गेल्यानंतर हा फोटो पोस्ट करावा लागेल याचा विचार देखील केला नव्हता. तुम्हाला हा फोटो पहावाच लागेल. मिस यू. हॅपी फादर्स डे…डॅडी आय लव्ह यु!”

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

 

अर्पिता खान शर्माने आयुषला दिल्या फादर्स डेच्या शुभेच्छा

आजच्या फादर्स डे निमित्ताने बॉलिवूडचा दबंग अभिनेला सलमान खानची बहिण अर्पिता खान शर्मा हिने देखील एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये पती आयुष शर्मा आणि त्यांचा मुलगा आहिल शर्मा हे दोघे दिसून येत आहेत. हा फोटो शेअर करताना अर्पिताने लिहिलं, “लाडके पपी…तु कायम आमचा पॉवर रेंजर, आमचा योद्धा, ऑप्टीमस प्राइम आहेस. आम्ही खूप प्रेम करतो तुझ्यावर. हॅपी फादर्स डे सुपर डॅड… ”

पुजा बत्राने सासऱ्यांसोबत शेअर केला फोटो

बॉलिवूड अभिनेत्री पुजा बत्राने आपल्या सासऱ्यांसोबत फोटो शेअर त्यांना फादर्स डे च्या शुभेच्छा दिल्या. हा फोटो शेअर करताना पोस्टमध्ये तिने लिहिलंय, “जगातल्या सुंदर वडिलांना फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा…माझ्या आयुष्यात येऊन माझा प्रत्येक दिवस आनंदाचा बनवल्याबद्दल खूप खूप आभार. तुम्ही एक उत्तम सासरे आहात. तुमचा आशिर्वाद कायम माझ्या डोक्यावर राहू द्या.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Batra Shah (@poojabatra)

सोहा अली खानने शेअर केला बाप-लेकीचा व्हिडीओ

बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खानने मुलगी इनाया आणि कुणाल खेमूचा एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये कुणाल खेमू त्याची मुलगी इनायाच्या डोक्यावर तेल लावून मसाज करताना दिसून येतोय. हा व्हिडीओ शेअर करताना सोहा अली खानने लिहिलं, “फक्त फादर्स डे आहे म्हणून नाही…तर प्रत्येक रविवारचा कार्यक्रम…”

 

View this post on Instagram

 

A post shared by Soha (@sakpataudi)

जेनेलियाने पिता-पुत्रांचा व्हिडीओ शेअर करत रितेशला दिल्या शुभेच्छा

जेनेलिया डिसूजाने दोन्ही मुलांसोबत रितेश देशमुखचा एक व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिलं, “रियान आणि साहिलचे लाडके बाबा…जगातल्या सगळ्यात बेस्ट पिता बनण्यासाठी खूप खूप आभार. मुलांनी बाबांमधला ब जर म्हटले तरी तुझं लक्ष त्यांच्याकडे जातं…मुलांसाठीचा तुझा निस्वार्थपणा, संयमीपणा आहे तसा मलाही ठेवता आला असता तर….पण यात मी तुला हरवू शकणार नाही…तु जगातल्या सगळ्यात बेस्ट बाबा आहेस आणि हे तुलाही माहितेय…माझ्यातल्या पालकत्वामध्ये माझा सोबती बनलास यासाठी तुझे आभार. हॅपी बाबा डे!”

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

 

सुरुवातीला केवळ अमेरिकेतच फादर्स डे साजरा केला जात होता. मात्र कालांतराने या दिवसांचं महत्त्व पटल्यानंतर भारतातही Father’s Day साजरा करण्यात येतोय. वडिलांप्रती आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी संपूर्ण जगभरात फादर्स डे चे अनोखं महत्त्व आहे. बॉलिवूडकर प्रमाणे आता सामान्य जनताही या दिवसाचं महत्त्व ओळखून फादर्स डे साजरा करू लागले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2021 11:38 am

Web Title: happy fathers day 2021 bollywood celebrities wishing their real life superheroes on social media updates prp 93
Next Stories
1 पत्नीला त्रासदायक म्हणणाऱ्या नेटकऱ्याला, शोएबने दिले सडेतोड उत्तर
2 ‘कलर्स मराठी’वर लग्नसोहळे
3 ‘लोक काय म्हणतील याची भीती उरलेली नाही’