News Flash

Father’s day 2020 : वडिलांचा फोटो शेअर करत बिग बींची हृदयस्पर्शी पोस्ट

पाहा, अमिताभ बच्चन यांनी कोणती पोस्ट शेअर केली आहे

बाबा या एका शब्दांत सारं काही सामावलं आहे. जशी आई मायेची सावली असते, तसंच वडील हे आधाराचा वटवृक्ष असतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात जितकं आईला महत्त्व आहे, तितकचं वडिलांनादेखील आहे. त्यामुळे मदर्स डे प्रमाणेच फादर्स डेदेखील साजरा केला जातो. वडिलांविषयी असणार प्रेम, आदर व्यक्त करण्यासाठी फादर्स डे साजरा केला जातो.त्यामुळे आजहीदेखील सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण आपल्या वडिलांना या खास दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. यात अमिताभ बच्चन यांनीही फादर्स डेच्या शुभेच्छा देत एक खास फोटो शेअर केला आहे.

बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या वडिलांचा एक फोटो शेअर केला आहे. सोबतच त्याच्या स्वत:चा देखील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये बिग बी हुबेहूब त्यांच्या वडिलांप्रमाणे लिखाण काम करण्यात व्यस्त असल्याचं दिसून येत आहे. या फोटोला त्यांनी “हमें पढ़ाओ न… रिश्तों की कोई और किताब…पढ़ी है बाप के चेहरे की… झुर्रियाँ हम ने…!!” असं कॅप्शन दिलं आहे.

दरम्यान, सध्या बिग बींनी शेअर केलेला हा फोटो अनेकांचं लक्ष वेधत आहे. बिग बींप्रमाणेच अनेकांनी त्यांच्या वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2020 3:00 pm

Web Title: happy fathers day amitabh bachchan share his father photo and wish ssj 93
टॅग : Fathers Day
Next Stories
1 ‘आत्महत्येबाबत आमच्यात झाली होती चर्चा’; सुशांतच्या मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
2 सुशांतच्या आत्महत्येनंतर सलमानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला..
3 Father’s day 2020 : ‘बाप तो बाप होता हैं’; प्रविण तरडेंकडून वडिलांना खास शुभेच्छा
Just Now!
X