News Flash

Independence Day 2018: ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, सेलिब्रिटींचा स्वातंत्र्यदिन

बॉलिवूड, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींनी अनोख्या पद्धतीने त्यांच्या चाहत्यांना आणि देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रणवीर सिंग, अमृता राव

देशभरात ७२वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडियावरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलिवूड, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींनी अनोख्या पद्धतीने त्यांच्या चाहत्यांना आणि देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता रणवीर सिंगने लहान मुलांसोबत स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे.

अभिनेता कार्तिक आर्यनने त्याच्या शाळेत ध्वजारोहण करत स्वातंत्र्यदिन साजरा केला.

अभिनेत्री अमृता रावने ट्विटरच्या माध्यमातून हा फोटो पोस्ट करत देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

क्रिकेटर हार्दीक पांड्याने ट्विटरच्या माध्यमातून दिल्या शुभेच्छा

देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांना अभिवादन करत अभिनेत्री प्रिती झिंटाने स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Next Stories
1 CONTROVERSIAL : ‘नमस्ते इंग्लंड’ वादाच्या भोवऱ्यात; दाखवला भारताचा चुकीचा नकाशा
2 प्रियांकाला भेटण्यासाठी निक जोनास सहकुटुंब येणार भारतात
3 Manikarnika first poster : खूब लडी मर्दानी झांसी की राणी!
Just Now!
X