राखी सावंत आणि ड्रामा हे समीकरण बॉलिवूडसाठी आता काही नवं राहिलं नाही. राखी कायमच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे किंवा चित्रविचित्र वागण्यामुळे चर्चेत येत असते. अनेक वेळा सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या राखीने व्हॅलेंटाइन डेचं निमित्त साधत अभिनेता रणवीर सिंहसाठी खास भेट दिली आहे. काही दिवसांपूर्वी रणवीरने एका कार्यक्रमात राखीचं कौतुक करत तिला आय लव्ह यू असं म्हटलं होतं. रणवीरच्या या वक्तव्यानंतर राखीने आज व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी त्याला खास रिटर्न गिफ्ट दिलं आहे.

रणवीरच्या आय लव्ह यू चं उत्तर देण्यासाठी राखीने खास व्हॅलेंटाइन डेची निवड केल्याचं पाहायला मिळालं. राखीने एका व्हिडिओच्या माध्यमातून रणवीरला आय लव्ह यू म्हणत त्याच्या नावाचा टॅटू गोंदवून घेतला आहे. विशेष म्हणजे राखीने दिलेलं हे उत्तर पाहुन चाहत्यांसोबत रणवीरदेखील हैराण होईल यात शंका नाही.

राखीने रणवीरला उत्तर देण्यासाठी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती एका टॅटू पार्लरमध्ये रणवीरच्या नावाचा टॅटू गोंदवून घेताना दिसत आहे. राखीने रणवीर सिंह असं नाव गोंदवून घेतलं आहे. त्यासोबतच ती रणवीरला आय लव्ह यू देखील म्हणाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

‘तू मला रॉकस्टार म्हणालास, माझं कौतुक केलं. इतकंच नाही तर मला आय लव्ह यूदेखील म्हणालास. तू माझ्यावर केलेल्या या प्रेमाच्या वर्षावाचं उत्तर कसं द्यावं मला समजत नाहीये. त्यामुळे मी थोडसं खास आणि हटके अंदाजात रिटर्न गिफ्ट देत आहे’, असं म्हणतं राखीने व्हिडिओ शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

दरम्यान, राखीने हा व्हिडिओ शेअर करताना रणवीर, दीपिका आणि आलिया यांना टॅग केलं आहे. त्यासोबतच तिने ‘गली बॉय’ या चित्रपटाच प्रमोशनही केल्याचं दिसून येत आहे. मात्र राखीने शेअर केलेल्या या व्हिडिओमुळे ती नेहमीप्रमाणेच यावेळी ट्रोल झाली आहे.