यंदाच्या वर्षात बॉलीवूडमध्ये अनेक सेलिब्रेटींच्या घरी पाळणा हलला. नुकतेच आई-बाबा झालेल्या करिना कपूर आणि सैफ अली खानवर सध्या त्यांच्या पहिल्या बाळाच्या आगमनानंतर सर्वांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघातील फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याची पत्नी गीता बसरा यांनीही एका गोंडस मुलीला जन्म दिला. हिनाया हीर असे त्यांनी आपल्या मुलीचे नाव ठेवले.
नुकतीच हरभजन आणि गीताने हिनायाची यंदाची पहिली लोहरी साजरी केली. पंजाबमध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळेच मुलीच्या पहिल्या लोहरीसाठी हरभजन आणि गीताने जय्यत तयारी केली होती.
गीताने तिच्या इन्स्टाग्रामवर त्यांनी मुलीसोबतचा झक्कास सेल्फी शेअर करून तिला या पवित्र सणाच्या शुभेच्छा दिल्या. फोटोत हिनाया फारच गोंडस दिसत आहे. हरभजनने त्यांच्या या क्यूट कुटुंबासोबत एक सेल्फीही काढला आहे. गीताने हा फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या त्यांच्या फोटोला चाहत्यांनी भरभरुन लाइक्स दिले.
या फोटोला शेअर करताना गीताने लिहिले की, ‘आमचे जीवनच बनून गेलेल्या मुलीला तिच्या पहिल्या लोहरीच्या खूप खूप शुभेच्छा. तू आमचं आयुष्य आहेस देव तुझे सदैव रक्षण करो आणि तुला कोणत्याच गोष्टीची कमतरता न भासो.’
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 14, 2017 9:41 pm