News Flash

इंग्रजी स्पेलिंगवरुन हरभजन वीणामध्ये टिवटिवाट

दोघांनीही एकमेकांची खिल्ली उडवली आहे.

पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सध्या ती भारतीय क्रिकेटर हरभजन सिंह बरोबर सोशल मीडियावर झालेल्या वादामुळे चर्चेत आहे. वीणाने हरभजनच्या ट्विटवर आक्षेप घेत प्रतिक्रीया दिली होती. या प्रतिक्रीयेची हरभजनने ट्विटच्या माध्यमातून खिल्ली उडवली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी भाषण केले होते. अणुयुद्धाचा संदर्भ देऊन केलेल्या या भाषणावर हरभजन सिंहने प्रतिक्रीया दिली होती. या प्रतिक्रीयेवर आक्षेप घेत हरभजनने लिहलेल्या इंग्रजीची विणाने खिल्ली उडवली होती. “इमरान खान यांनी आपल्या भाषणात शांती आणि संयमाची भाषा केली आहे. तुला एवढे साधे इंग्रजी कळत नाही का?” अशा शब्दात वीणा मलिकने हरभजनच्या इंग्रजीची खिल्ली उडवली होती. परंतु गंमतीशीर बाब म्हणजे वीनाने हरभजनची खिल्ली उडवण्यासाठी वापरलेल्या इंग्रजी शब्दांमधील व्याकरणात काही चूका होत्या. या चूकांवरुन आता हरभजनने वीणाची खिल्ली उडवली आहे.

हरभजनने केलेले हे ट्विट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आतापर्यंत १२ हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी या संपूर्ण वादावर आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. भारतीय नेटकऱ्यांनी वीणा मलिकची खिल्ली उडवली आहे. तर पाकिस्तानी नेटकऱ्यांनी हरभजन सिंहच्या प्रतिक्रीयेवर आपला आक्षेप दर्शवला आहे. वीणा मलिक नेहमीच सोशल मीडियावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असले. काही दिवसांपूर्वी विणा भारतीय चांद्रयान मोहिमेवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे चर्चेत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 5:40 pm

Web Title: harbhajan singh veena malik mppg 94
Next Stories
1 20 Years of Vaastav : ऐनवेळी अभिनेत्याने नाकारल्याने संजय नार्वेकरला मिळाली ‘वास्तव’मधील भूमिका
2 ..म्हणून सलमान राहतो वन बीएचके प्लॅटमध्ये
3 Photo : ऋषी कपूर यांनी दिला ‘या’ आगळ्यावेगळ्या शस्त्राच्या पूजेचा सल्ला
Just Now!
X