News Flash

हार्दिक जोशीच्या कुटुंबीयांनी केलं नव्या सदस्याचं स्वागत

त्याची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘तुझ्यात जीव रंगला.’ या मालिकेतील राणादा आणि पाठक बाईंनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. राणादा ही भूमिका अभिनेता हार्दिक जोशीने साकारली होती तर पाठक बाई ही भूमिका अभिनेत्री अक्षया देवधरने साकारली होती. हार्दिक हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकताच त्याने एक बाळासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो पाहून हे बाळ कोणाचे आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

हार्दिकने एका गोंडस बाळासोबतचा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने ‘माझ्या बहिणीच्या आयुष्यात या चिमुकल्याचे आगमन झाले आहे. त्याबद्दल मी तिचे अभिनंदन करतो. अयांश तुझे स्वागत आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. हार्दिकच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

हार्दिकने २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रंगा पतंग’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. पण त्याल ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले. या मालिकेतील राणादाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली होती. त्यापूर्वी त्यान क्राइम पेट्रोल, अस्मिता, दुर्वा, स्वप्नांच्या पलीकडे या मालिकांमध्ये काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 5:22 pm

Web Title: hardik joshi shares picture with niece avb 95
Next Stories
1 “ती म्हणजे मला देवानं दिलेलं गिफ्ट आहे”, शक्ती कपूर झाले भावूक
2 करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून रवीनाचा अजब उपाय, पाहा मजेशीर व्हिडीओ
3 “सुशांतसोबत ब्रेकअपनंतर मी डिप्रेशनमध्ये गेले होते”, अंकिता लोखंडेचा खुलासा
Just Now!
X