News Flash

हार्दिकने ‘या’ अभिनेत्रीला दिलं खास गिफ्ट; अफेअरच्या चर्चांना उधाण

दोघांनीही शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

भारतीय क्रिकेट खेळाडू हार्दिक पांड्या आपल्या बॉलिवूडमधील मैत्रिणींमुळे नेहमीच चर्चेत असतो. यावेळी हार्दिक अभिनेत्री उर्वशी रौतेलामुळे चर्चेत आहे. त्याने उर्वशीला एक कुत्र्याचे पिल्लू भेट म्हणून दिले. हार्दिकने दिलेल्या या अनोख्या भेटीमुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

+ + = PAGALPANTI . . . . . . . . . . . . . #love #UrvashiRautela #pets #dogsofinstagram #Pagalpanti

A post shared by (@urvashirautela) on

उर्वशी अलिकडेच ‘पागलपंती’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी हार्दिकने तिला ही भेटवस्तु दिली अशी माहिती आज तक या वेबसाईटने दिली आहे. या कुत्र्याच्या पिल्लासोबत काढलेला एक फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. “हा आहे, आमच्या घरातील नवा सदस्य” असे म्हणत तिने या भेटवस्तुची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. गंमतीशीर बाब म्हणजे यानंतर हार्दिकने देखील या पिल्लासोबत काढलेला एक फोटो आपल्या इन्स्टाग्रमाम अकाऊंटवर शेअर केला आहे. यामुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. दोघांनीही शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. आतापर्यंत हजारो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

Keep your furry friends close this Diwali

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

हार्दिक पाठीच्या दुखापतीमुळे गेला काही काळ क्रिकेटपासून दूर आहे. काही दिवसांपूर्वी तो उपचार करण्यासाठी लंडन येथे गेला होता. परंतु आता तो भारतात परतला आहे. त्यामुळे हार्दिक लवकरच क्रिकेटच्या मैदानात धडाकेबाज फलंदाजी करताना दिसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 2:50 pm

Web Title: hardik pandya gifted puppy to urvashi rautela mppg 94
Next Stories
1 तापसी तापली! ‘बदला’मध्ये माझी भूमिका जास्त असूनही…
2 ‘तुला पाहते रे’नंतर सुबोध पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर
3 Video: एकमेकांचे वैरी सिद्धार्थ-रश्मी अचानक ‘बिग बॉस’च्या घरात करु लागले रोमान्स
Just Now!
X