कला आणि क्रीडा विश्वाचे चांगलेच नाते असल्याचे म्हटले जाते. या दोन्ही क्षेत्रांना विविध कारणांमुळे समोरासमोर यावे लागले आहे. त्यातच सेलिब्रिटींसोबत क्रीडापटूंचे सूत जुळण्याचे प्रमाणही वाढले आहे. या साऱ्यात आणखी एका क्रिकेटपटूचे नाव जोडण्यात आले आहे ते म्हणजे हार्दिक पांड्याचे.
हार्दिक खेळासोबतच त्याच्या लव्ह लाईफमुळे नेहमीच चर्चेत असतो. आता पर्यंत अनेक बॉलिवूडमधील अभिनेत्रींसोबत त्याचे नाव जोडण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी हार्दिक अभिनेत्री उर्वशी रौतेलाला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण उर्वशीने हार्दिक तिचा बॉयफ्रेंड नसल्याचे सांगत अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम लावला होता. आता हार्दिक दुसऱ्या एका अभिनेत्रीला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. हार्दिक आणि त्या अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
‘स्पॉटबॉय’ने दिलेल्या वृत्तानुसार हार्दिक पांड्या अभिनेत्री नताशा स्टेनकोविकसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. दोघेही गेल्या काही दिवसांपासून दुबईमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असून एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. नताशा आणि हार्दिकने दुबईमधील समुद्र किनाऱ्यावरील काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. हार्दिक समुद्र किनाऱ्यावर दिसत आहे तर नताशा स्विमिंग पुलच्या बाजूला आराम करताना दिसत आहे. एकंदरीत त्यांच्या या फोटोंवरुन ते दोघे रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 3, 2019 2:19 pm