28 February 2021

News Flash

हार्दिक-नताशाच्या फोटोवर बॉलिवूड अभिनेत्याची वादग्रस्त कमेंट

दोघांच्या रंगावरून केली विचित्र टिप्पणी

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या गेले काही दिवस दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. पण तो त्याच्या ‘लव्ह लाईफ’मुळे जोरदार चर्चेत आला आहे. हार्दिक पांड्याने इन्स्टाग्रामवरून आपल्या होणाऱ्या पत्नीच्या नावाची घोषणा केली आहे. ती म्हणजे अभिनेत्री आणि सर्बियन मॉडेल नताशा स्टॅन्कोविक… हार्दिकने नताशाला एका प्रायव्हेट बोटीवर समुद्राच्या मधोमध अतिशय रोमँटिक प्रकारे प्रपोझ केलं आणि तिला अंगठी घालत आपण ‘एन्गेज’ झाल्याचं सांगितलं.

हार्दिकनंतर आता ‘या’ खेळाडूचा नंबर? प्रेयसीसोबतच्या फोटोनंतर चर्चांना उधाण

हार्दिक पांड्या नेहमी आपल्या मैत्रीणींसोबत फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. हार्दिकच्या आयुष्यात कुठली नवी तरुणी डोकावतेय याबाबत कायम उलट सुलट चर्चा क्रिकेट रसिकांमध्ये सुरू असते. पण हार्दिकने नताशासोबतचा फोटो टाकून थेट चर्चांना पूर्णविराम दिला. त्याने थेट नताशाला अंगठी देत तिला आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडलं. नताशानेदेखील या ‘रोमँटिक प्रपोझल’चा व्हिडीओ शेअर केला.

वाचा – “गंभीर सर, मला मदत करा… माझ्यावर प्रशिक्षक बलात्काराचा प्रयत्न करतात”

हार्दिक-नताशाच्या फोटोवर बॉलिवूड अभिनेत्याची वादग्रस्त कमेंट

हार्दिकच्या साखरपुड्याची ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली. त्याच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. क्रिकेट विश्वातूनच नव्हे तर इतर क्षेत्रांतूनही हार्दिकवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. पण बॉलिवूड अभिनेता केआरके म्हणजेच कमाल आर खान याने त्यांच्या फोटोवर वादग्रस्त कमेंट केली आहे. त्यांच्या वर्णावर कमेंट करत त्याने एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात दोघांच्या रंगांच्या तफावतीबाबत त्याने विचित्र पद्धतीने कमेंट केली आहे.

हार्दिकची गर्लफ्रेंड नताशा स्टॅन्कोविच आहे तरी कोण?

दरम्यान, फोटो शेअर करताना हार्दिक पांड्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “मै तेरा, तू मेरी जाने सारा हिंदुस्थान!” फोटोनंतर हार्दिक आणि नताशाचे हे विवाहबंधनात कधी अडकणार याकडे साऱ्या चाहत्यांचे लक्ष लागले आहेत. हार्दिक पांड्याचे नाव या आधी अभिनेत्री इशा गुप्ता, उर्वशी रौतेला आणि एली अवराम यांच्याशीही जोडले गेले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2020 1:28 pm

Web Title: hardik pandya natasa stankovic engagement photo bollywood actor krk racist comment vjb 91
Next Stories
1 हार्दिकनंतर आता ‘या’ खेळाडूचा नंबर? प्रेयसीसोबतच्या फोटोनंतर चर्चांना उधाण
2 IND vs SL : पहिल्या टी-२० सामन्यात महत्वाचा बदल, जाणून घ्या काय घडलंय…
3 Video : दुखापतीनंतर बुमराह सज्ज, भन्नाट यॉर्करने उडवला त्रिफळा
Just Now!
X