News Flash

हार्दिक-नताशाचा हटके ‘फॅमिली’ फोटो पाहिलात का?

फोटो पाहून तुमच्या चेहऱ्यावरील उमटेल स्मितहास्य

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टॅन्कोविच यांचे प्रेम प्रकरण नेहमीच चर्चेत असते. तशातच लॉकडाउनदरम्यान नताशा आणि हार्दिक हे आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी हार्दिकने इन्स्टाग्रामवरून दिली. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चार फोटो पोस्ट केले आणि गोड बातमी सांगितली. हार्दिकने आपली गर्लफ्रेंड नताशा हिच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये नताशा गरोदर असून हार्दिकने अगदी प्रेमाने तिच्या पोटाजवळ हात धरून ते दोघे आई-बाबा होणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर नुकताच हार्दिकने एक हटके फॅमिली फोटो पोस्ट केला आहे.

हार्दिकने आपल्या इन्स्टाग्रामवर एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये हार्दिकच्या मांडीवर नताशाने डोकं ठेवलं आहे. या फोटोची खासियत म्हणजे या फोटोत त्यांच्या आसपास कुत्र्यांची तीन पिल्लं आहेत. या पाच जणांच्या फोटोखाली कॅप्शन लिहिताना त्याने ‘फॅमिली’ असं म्हटलं आहे. सहसा आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्ती एकत्र असेल तेव्हा त्याला फॅमिली फोटो म्हणतात. पण हार्दिकने कुत्र्यांच्या छोटाशा कुटुंबासोबत फोटो पोस्ट करत त्यांना आपल्या कुटुंबात स्थान दिल्याचं फोटोत दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

Family Photographer- @rahuljhangiani Hardik’s stylist – @nikitajaisinghani Natasa’s stylist – @soodpranav

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

दरम्यान, नताशाने अलिकडेच तिच्या बेबीशॉवरचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. सध्या लॉकडाउन असल्यामुळे या जोडीने घरच्या घरीच नताशाचं बेबीशॉवर (डोहाळजेवण) केलं होतं. याचे काही फोटो शेअर करत, मी आणि हार्दिकने एकत्र मिळून एक मोठा प्रवास केला आहे. त्यामुळे आमच्या आयुष्यात येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी आम्ही फार आनंदित आहोत, असं कॅप्शन नताशाने फोटोंना दिलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 4:43 pm

Web Title: hardik pandya natasa stankovic family photo on instagram will make you smile vjb 91
Next Stories
1 रणबीर कपूरच्या डुप्लीकेटचं निधन; ऋषी कपूर देखील होते त्याच्या लूकचे फॅन
2 Success Story : बर्लिन फिल्म फेस्टीव्हलमध्ये पोहोचलेल्या मराठमोळ्या दिग्दर्शकाची मुलाखत
3 “हे सारं कल्पनेच्या पलिकडलं”; मुंबईत नसतानाही अभिनेत्रीला आलं ३२ हजार वीज बिल
Just Now!
X