23 September 2020

News Flash

हार्दिकला ‘भाऊ’ म्हटल्यामुळे क्रिस्टल डिसुजा झाली ट्रोल

हा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांचा हार्दिकवर असलेला राग पुन्हा एकदा उफाळून आला आहे

बॉलिवूड अभिनेत्री क्रिस्टल डिसुजा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी क्रिस्टल तिच्या आयुष्याशी निगडीत अनेक लहान-मोठ्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. अनेकदा तिने केलेल्या पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. आताही क्रिस्टलसोबत काहीसं असंच झालं आहे. नुकत्याच केलेल्या एका पोस्टमुळे ती सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. क्रिस्टलनं क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. मात्र हा फोटो शेअर केल्यानंतर क्रिस्टलला युजर्सने चांगलंच ट्रोल केलं आहे.

क्रिस्टलनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर हार्दिक सोबतचा फोटो शेअर करत त्याला, ‘मेरे भाई जैसा कोई हार्डिच नहीं है.’असं कॅप्शन दिलं आहे. तसंच तिने या फोटोसाठी Brother from Another Mother असा हॅशटॅगही वापरला आहे. मात्र हा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांचा हार्दिकवर असलेला राग पुन्हा एकदा उफाळून आला आहे. परिणामी नेटकऱ्यांनी क्रिस्टललादेखील ट्रोल केलं आहे.

 

View this post on Instagram

 

Mere Bhai Jaisa Koi Hard ich Nahi Hai . . . . #brotherfromanothermother

A post shared by (@krystledsouza) on

काही महिन्यांपूर्वी हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल यांनी करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये या दोघांनीही महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यामुळे हार्दिक आणि के.एल. राहुलवर देशभरातून टीकेची झोड उठली होती. त्यातच क्रिस्टलने हार्दिकसोबतचा फोटो शेअर केल्यानंतर तिलाही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

 

क्रिस्टलच्या या पोस्टने पुन्हा एकदा लोकांना कॉफी विथ करणमधील हार्दिकच्या त्या वक्तव्यांची आठवण करून दिली. एका युजरनं लिहिलं, ‘क्रिस्टल तू पहिल्यांदाच त्याला भाऊ म्हटलंस हे खूप चांगलं केलं.’ तर दुसऱ्या एका युझरनं, ‘तू वेस्ट इंडिजला का नाही जात,’ असंही म्हटलं आहे.

दरम्यान, हार्दिक ट्रोल होत असताना अभिनेता अपारशक्ती खुरानाने त्याची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. हार्दिक एक चांगला खेळाडू आहे आणि निदान वर्ल्डकपच्या आधी त्याच्याबाबत अशाप्रकारच्या गोष्टी आपण बोलायला नको, असं अपारशक्ती म्हणाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2019 11:45 am

Web Title: hardik pandya trolled for being krystal dsouzas brother heres what
Next Stories
1 सिद्धार्थच्या लग्नाबाबत प्रियांकाची आई म्हणते…
2 अजयच्या वेडापायी लागले गुटख्याचे व्यसन, झाला कॅन्सर अन् आता म्हणतो…
3 ‘बाळा’ एक समृद्ध करणारा अनुभव – दिग्दर्शक सचिंद्र शर्मा
Just Now!
X