22 October 2020

News Flash

पांड्याच्या पुश-अप्सवर बॉलिवूड अभिनेत्री फिदा; नताशाने केली ‘ही’ कमेंट

सानिया मिर्झालाही पडली हार्दिकच्या वर्कआऊटची भुरळ

बॉलिवूड आणि क्रिकेट हे समीकरण भारतासाठी काही नवीन नाही. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू असताना साऱ्यांच्या नजरा याच जोडीवर होत्या. त्यांच्या लग्नानंतर आता चाहत्यांना गॉसिपसाठी एक नवी जोडी मिळाली आहे. ती म्हणजे हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविच. काही दिवसांपूर्वी हार्दिकने त्याची गर्लफ्रेंड नताशा गरोदर असल्याची गोड बातमी दिली. त्या बातमीनंतर त्या दोघांबद्दल अनेक चर्चा रंगल्या. आता पुन्हा एकदा हे दोघे चर्चेत आले आहेत.

हार्दिक पांड्या हा आपल्या फिटनेसच्या बाबतीत खूप कडक शिस्तीचा आहे. तो बऱ्याचदा आपले जिममधील वर्कआऊटचे व्हिडीओ पोस्ट करत असतो. या वेळी हार्दिकने एक असा व्हिडीओ पोस्ट केला, ज्यात तो उड्या मारत पुश-अप्स करताना दिसला. साहजिकच या अनोख्या पुश-अप्सची चाहत्यांना भुरळ पडली. केवळ चाहतेच नव्हे तर दोन ब़ॉलिवूड अभिनेत्री आणि स्टार महिला क्रीडापटूही या पुश-अप्सवर फिदा झाली.

हार्दिकने पोस्ट केलेला व्हिडीओ –

 

View this post on Instagram

 

Stronger. Fitter. Still under construction @krunalpandya_official, I challenge you bhai! Let’s see how many you can do #PandyaBrothers

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

हार्दिकच्या त्या व्हिडीओवर अभिनेत्री संयमी खेर हिने, ‘हा वर्कआऊट खतरनाक आहे’, असे म्हटले. तर हिंदी मालिकांमुळे लोकप्रिय असलेली अभिनेत्री करिश्मा तन्ना हिने, ‘Wow… हे तू कसं केलंस’, अशी कमेंट करत आश्चर्य व्यक्त केलं. त्याशिवाय, स्टार टेनिसपटू सानिया मिर्झानेही, ‘हे खूपच भारी आहे’, अशी कमेंट केली.

या साऱ्या कमेंटनंतर नताशाने झकास रिप्लाय दिला. तिने हार्दिक तंदुरुस्त असल्याचा इमोजी पोस्ट करत कमेंट केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2020 1:20 pm

Web Title: hardik pandya workout push ups video attracts bollywood hot actresses and sania mirza his girlfriend natasa also gives reply vjb 91
Next Stories
1 “माझ्याशी पंगा घेतलास तर..”; सोनू निगमचा भूषण कुमारला इशारा
2 ‘रिकामं डोकं सैतानाचं घर’; ट्रोलर्सना अरबाज खानचं उत्तर
3 कंगना रणौतचा प्रसिद्ध फॅशन डिझायनरवर आरोप; म्हणाली…
Just Now!
X