मागच्या काही काळात वेबसिरिजचा ट्रेंड वाढल्याचे पहायला मिळत आहे. दर काही दिवसांनी नवनवीन विषय घेऊन निर्माते आणि दिग्दर्शक वेबसिरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत आहेत. यामध्ये आता आणखी एक भर पडणार आहे. अॅमेझॉन प्राईमतर्फे स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधत ‘हार्मनी विथ ए.आर.रेहमान’ ही नवी सिरिज दाखल करण्यात येत आहे. या माध्यमातून नागरिकांना भारतीय संगीताचा अानंद देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये चार वाद्ये आणि स्वर परंपरेच्या माध्यमातून भारताच्या संपन्न संगीतमय वारसाचा शोध घेतला जाणार आहे. यामध्ये ए.आर. रेहमान वाद्यांच्या ऐतिहासिक परंपरा, त्यातील जटीलता यांबाबत सांगणार आहेत. तसेच यामध्ये महाराष्ट्र, केरळ, सिक्कीम, मणिपूर येथील नयनरम्य ठिकाणी कलाकारांसोबत शूट केलेली चर्चासत्रेही ऐकता येणार आहेत. ही वेबसिरिज २०० देश आणि प्रांतातील प्राईम सदस्यांसाठी ही सिरिज उपलब्ध असेल.

याबाबत ए.आर. रेहमान म्हणाले, अॅमेझॉनसारख्या जागतिक मंचावर भारतीय परंपरा दाखविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार असल्याचा आनंद आहे. या सिरिजमध्ये महाराष्ट्रातील उत्सात मोहीबहुद्दीन डागर, केरळचे कलामंदलम साजित विजयन, मणिपूरच्या कलाकार खुनुंग ईशी, लौरेम्बम बेदाबती देवी, सिक्कीमचे मिकमा त्शेअरिंग लेप्चा यांचाही समावेश असेल. त्यामुळे आता अॅमेझॉनच्या माध्यमातून रसिकांना अतिशय उत्तम अशा कलाकृतीचा आनंद घेता येणार आहे. ए.आर.रेहमान  यानिमित्ताने डिजिटल क्षेत्रात पदार्पण करत आहेत.