एका विमान अपघातात जखमी झालेले ज्येष्ठ हॉलिवूड अभिनेते हरिसन फोर्ड यांना जवळजवळ महिन्याभरानंतर रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. ५ मार्च रोजी आपल्या विमानातून आकाशात घिरट्या घालत असताना दक्षिण कॅलिफोर्नियाच्या गोल्फ कोर्स मैदानावर विमान कोसळल्याने झालेल्या अपघातात त्याच्या डोक्याला इजा झाली. त्याशिवाय ओटीपोटाला आणि घोट्याच्या हाडांना मोठे नुकसान झाले. फोर्ड यांचे हे विमान दुसऱ्या जागतिक महायुद्धात वापरण्यात आलेले ऐतिहासिक विमान आहे. या कठीण प्रसंगात त्यांची पत्नी कॅलिस्टा फ्लॉकहार्ट सदैव त्यांच्या बरोबर राहून त्यांची देखभाल करत होती. सध्या फोर्ड घरी राहून आराम करत असले, तरी ते ओटीपोटातील दुखापतीवर अद्याप उपचार घेत आहेत.