23 September 2020

News Flash

हॅरी पॉटरचे लेखन करताना वापरलेल्या खुर्चीचा २.६ कोटींमध्ये लिलाव

रोलिंग यांनी याच खुर्चीवर बसून हॅरी पॉटरच्या पहिल्या दोन भागांचे लेखन केले होते.

हॅरी पॉटर या जगप्रसिद्ध पात्राच्या निर्मात्या जे.के.रोलिंग यांची खुर्ची एका नुकत्याच झालेल्या लिलावात २.६ कोटी रूपयांनी विकली गेली. रोलिंग यांनी याच खुर्चीवर बसून हॅरी पॉटरच्या पहिल्या दोन भागांचे लेखन केले होते. त्यामुळे न्यूयॉर्कमध्ये झालेल्या लिलावात या खुर्चीला विक्रमी किंमत मिळाली.
जे.के. रोलिंग राहत असलेल्या स्कॉटलंड येथील एडिबर्ग शहरातील त्यांच्या घरात असणाऱ्या चार खुर्च्यांपैकी ही एक खुर्ची आहे. ‘हॅरी पॉटर अँड द सॉर्सेर्स स्टोन’ आणि ‘हॅरी पॉटर अँड चेंबर ऑफ सिक्रेट्स’ ही दोन पुस्कते रोलिंग यांनी या खुर्चीवर बसून लिहिली होती. विक्रेता जेराल्ड ग्रे यांनी सांगितले की, आमच्या अपेक्षापेक्षा खूप मोठी किंमत आम्हाला मिळाली. एकविसाव्या शतकातील सर्वात महत्त्वाच्या साहित्यापैकी एका साहित्याच्या निर्मितीची ही खुर्ची साक्षीदार आहे.

_89116841_727bbc3e-ce51-425b-9a8f-ca1276f58d2d

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 3:17 pm

Web Title: harry potter writer j k rowling chair sold for 4 lakhs dollars
Next Stories
1 हरभजनची पत्नी गीता देणार गोड बातमी?
2 पाडव्याच्या मुहुर्तावर ‘देवयानी’ मध्ये प्रेमाचा गृहप्रवेश
3 आणखी एक बॉलीवूड जोडी होणार विभक्त
Just Now!
X