26 February 2021

News Flash

बहिण सोनमला हर्षवर्धनकडून लग्नाचं ‘हे’ खास गिफ्ट

८ मे रोजी सोनम आणि आनंदचं मुंबईत विवाहसोहळा पार पडणार आहे.

हर्षवर्धन कपूर, सोनम कपूर

बॉलिवूडमध्ये सध्या एकाच गोष्टीची जोरदार चर्चा पाहायला मिळतेय, ती म्हणजे सोनम कपूर आणि आनंद अहुजाच्या लग्नाची. मंगळवारी सोनमच्या लग्नाची तारीख जाहीर होताच कलाविश्वात आणि सोनमच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. या विवाहसोहळ्याची लगबग सुरू असतानाच सोनमचा भाऊ हर्षवर्धन कपूर याच्या आगामी ‘भावेश जोशी सुपरहिरो’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात त्याने बहिणीला लग्नात काय भेट देणार याबाबत सांगितले.

अवघ्या पाच दिवसांवर असलेल्या सोनमच्या लग्नाबाबत हर्षवर्धनने आनंद व्यक्त केला. सोनमच्या लग्नाची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं त्याने म्हटलं. बहिणीच्या लग्नात तिला काय भेट देणार असा प्रश्न एकाने त्याला या कार्यक्रमात विचारलं. तेव्हा आपण सध्या चांगलं कमवत नसून तिला फक्त भरभरून प्रेमच देऊ शकतो असं गमतीशीर उत्तर त्याने दिलं.

Video : ‘दमछाक..’ या मराठमोळ्या गाण्याचा सोशल मीडियावर धडाका

‘एक मिठी…(हसतो) मी मस्करी करतोय. पण मी तिला भरभरून प्रेम भेट म्हणून देईन. मी ज्याप्रकारचे चित्रपट करतोय, त्यातून मला काही खास पैसे मिळत नाहीत (पुन्हा हसतो). त्यामुळे मी तिला महागडं असं काही न देता माझं प्रेमच भेट म्हणून देईन,’ असं तो म्हणाला.
हर्षवर्धनचा ‘मिर्झियाँ’नंतर दुसरा चित्रपट ‘भावेश जोशी सुपरहिरो’ २५ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या घरात लगीनघाई असल्याने चित्रपटाचे प्रमोशन आणि लग्नाची तयारी यामध्ये त्याला तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र, सोनमच्या लग्नानंतर आपला पूर्ण वेळ प्रमोशनला देणार असल्याचं त्याने म्हटलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2018 7:48 pm

Web Title: harshvardhan kapoor reveals what he will gift sonam on her wedding
Next Stories
1 Video : ‘दमछाक..’ या मराठमोळ्या गाण्याचा सोशल मीडियावर धडाका
2 असाही एक ‘ड्राय डे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
3 VIDEO : कसम परेडसाठी ‘लागिरं झालं जी’च्या अज्यानं गाळला घाम
Just Now!
X