करोनाची दुसरी लाट देशभरात उसळली आहे. रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतं आहे. यामुळे कोणाला बेड मिळत नाही, तर कोणाला ऑक्सिजन. हे सगळं पाहता अनेक बॉलिवूड कलाकारांनी पुढे येऊन गरजूंना मदत करण्याचे ठरवले. आता बॉलिवूड अभिनेता हर्षवर्धन राणे गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. गरजू लोकांना मदत करण्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली आहे.

हर्षवर्धनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये बाईकचे फोटो त्याने शेअर केले आहेत. हर्षवर्धनची ही आवडती बाईक असल्याचे म्हटले जाते. “कृपया कोणी तरी माझी ही बाईक विकत घ्या… त्यातून मिळणाऱ्या पैशांतून मी ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर विकत घेईल आणि ज्यांना गरज आहे त्यांना मदत करेन…हैदराबादमध्ये मला चांगल्या गुणवत्तेचे ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर शोधण्यास मदत करा….”, अशा आशयाचे कॅप्शन हर्षवर्धनने ते फोटो शेअर करत दिले आहे.

prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
Pakistani actor Imran Abbas claims he was offered Aashiqui 2
“आशिकी २, पीके, हीरामंडीची ऑफर मिळाली होती,” पाकिस्तानी अभिनेत्याचा दावा; म्हणाला, “महेश भट्ट…”
Madhuri Dixit cried ranjeet scene
विनयभंगाच्या सीनआधी खूप रडली होती माधुरी दीक्षित, काम करण्यास दिलेला नकार; प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितली आठवण
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

‘सनम तेरी कसम’ या चित्रपटातून हर्षवर्धन प्रकाश झोतात आला आहे. तर हर्षवर्धन लवकरच जॉन अब्राहमच्या चित्रपटात दिसणार आहे. ‘तारा बनाम बिलाल’ असं या चित्रपटाचं नाव आहे.