हरियाणातील प्रसिद्ध गायिका आणि नर्तिका हर्षिता दहिया हिची मंगळवारी हत्या करण्यात आली. ती २२ वर्षांची होती. हर्षिता काल संध्याकाळी एका कार्यक्रमानंतर घरी परतत असताना तिच्यावर हल्ला करण्यात आला. फोर्ड फिगो गाडीमधून दोन अज्ञात हल्लेखोर तिचा पाठलाग करत होते. यावेळी हर्षिता आपल्या तीन मित्रांसह गाडीतून प्रवास करत होती. पानिपत परिसरात असताना हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवली आणि तिच्या सहकाऱ्यांना गाडीतून बाहेर काढले. त्यानंतर गाडीत बसलेल्या हर्षितावर हल्लेखोरांनी अगदी जवळून चार गोळ्या झाडल्या. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.

Pune, firing, Firing on youth,
पुणे : शहरात गोळीबारची तिसरी घटना, काडीपेटी न दिल्याने तरुणावर गोळीबार
garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
policeman committed suicide by shooting himself in the head
नागपूर : डोक्यात गोळी झाडून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; कामाचा ताण की…
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
View this post on Instagram

A post shared by harshita dahiya (@harshita_jatni)

हर्षिताला अनेक दिवसांपासून फोनवरून निनावी धमक्या येत होत्या. हर्षिताने तिच्या फेसबुक लाइव्ह चॅटमध्येही याची वाच्यता केली होती. पोलिसांनी या हत्येमागे दोन कारणे असल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी हर्षिताने तिच्या बहिणीच्या नवऱ्यावर बलात्काराचे आरोप केले होते. याच आरोपामुळे सध्या तो तुरूंगात आहे. तसेच हर्षिताच्या आईचीही हत्या करण्यात आली होती. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.