News Flash

क्रितीसोबतही पटेना; सुशांतचं पुन्हा ब्रेकअप

'राबता' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान क्रिती आणि सुशांत यांच्यात मैत्री झाली.

सुशांत सिंग राजपूत, क्रिती सनॉन

अभिनेता सुशांत सिंग राजपूत जितकं त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो, तितकंच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही प्रकाशझोतात असतो. ‘राबता’ या चित्रपटातील त्याची सहकलाकार क्रिती सनॉन हिच्यासोबतच्या अफेअरची चर्चा तशी फार जुनी नाहीच. पण अवघ्या काही महिन्यांतच या दोघांनी ब्रेकअप केल्याचं कळत आहे.

‘पिंकविला’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, क्रितीने सुशांतसोबतचं नातं मोडण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या व्यग्र वेळापत्रकामुळे या दोघांनी एकमेकांना काही काळासाठी ब्रेक देण्याचा निर्णय घेतला होता. पण आता त्यांच्या नात्याला कायमचा ब्रेक लागल्याचं समजत आहे.

‘राबता’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान क्रिती आणि सुशांत यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर एकमेकांच्या ताटात जेवण्यापासून ते शूटिंगनंतर एकमेकांसोबत खासगी क्षण घालवण्यापर्यंत हे दोघे परस्परांत गुंतले होते. सध्या सुशांत ‘क्रिजी और मनी’ या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये तर क्रिती ‘लुकाछिपी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

क्रिती सनॉन सुशांतच्या आयुष्यात येण्यापूर्वी त्याचं अभिनेत्री अंकिता लोखंडेशी अफेअर होतं. ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेत दोघांनी एकत्र काम केलं होतं आणि तिथंच त्यांच्या नात्याला सुरुवात झाली. पण काही वर्षांनी सुशांत आणि अंकिताचं जमत नसल्याने त्यांनी ब्रेकअपचा निर्णय घेतला. आता अंकिताही ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 10:16 am

Web Title: has raabta actress kriti sanon broken up with sushant singh rajput
Next Stories
1 शाहरुख म्हणतो, हॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी माझं इंग्रजी वाईट
2 सुरुवातीच्या दिवसांमध्ये मुंबईत आलेल्या राधिकाकडे होता फक्त ‘या’ अभिनेत्याचा फोन नंबर
3 तीन वर्षांच्या संसारानंतर, आणखी एक सेलिब्रिटी जोडी विभक्त होण्याच्या मार्गावर
Just Now!
X