News Flash

‘लव्ह आज कल २’ मधून साराचा काढता पाय?

साराचा 'सिम्बा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.

सारा अली खान

२००९ साली प्रदर्शित झालेला ‘लव्ह आज कल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. यामध्ये सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका होती. आता याच चित्रपटाचा सिक्वल येणार असून यामध्ये सैफची लेक सारा अली खान आणि कार्तिक आर्यन झळकणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र या चित्रपटातून साराने काढता पाय घेतल्याचं समोर आलं आहे.

केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या साराचा ‘सिम्बा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे साराच्या अभिनय कौशल्यामुळे तिला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर ती ‘लव्ह आज कल २’ चित्रपटात झळकणार होती. मात्र चित्रपटाची स्क्रिप्ट न आवडल्यामुळे तिने या चित्रपटातून माघार घेतली आहे.

‘लव्ह आज कल २’ च्या माध्यमातून पहिल्यांदाच मला वडिलांसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. मात्र चित्रपटात माझ्या वाट्याला चांगली भूमिका आली असती तर मी नक्कीच या चित्रपटाचा विचार केला असता. या चित्रपटामध्ये माझी भूमिका केवळ नावापुरती आहे, त्यामुळे मी या चित्रपटासाठी माझा नकार दिला आहे, असं साराने एका मुलाखतीत सांगितलं. ‘लव्ह आज कल २ ‘ हा चित्रपट इम्तियाज अली दिग्दर्शित करणार आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 2:40 pm

Web Title: has sara ali khan backed out of love aaj kal 2
Next Stories
1 हॉलिवूडपटात माँ आनंद शीला यांची भूमिका साकारणार ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री
2 विराट व अनुष्कामध्ये आहेत ही साम्यस्थळं!
3 Koffee With Karan 6 : सिद्धार्थ मल्होत्राला करायचंय करिनाशी लग्न
Just Now!
X