News Flash

‘पागलपन की हद से ना गुजरे, वो प्यार कैसा?’, तापसीच्या ‘हसीन दिलरुबा’चा ट्रेलर प्रदर्शित

तापसीने चित्रपटात काही बोल्ड सीन दिले असल्याचे दिसत आहे.

चित्रपटात तापसीने काही बोल्ड सीन दिले असल्याचे दिसत आहे

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री तापसी पन्नू तिचा आगामी चित्रपट ‘हसीन दिलरुबा’मुळे चर्चेत आहे. तिने या चित्रपटाशी संबंधीत इन्स्टाग्राम अकाऊंटवर केलेल्या पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. एकंदरीत या पोस्ट पाहिल्यावर चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

२ मिनिटे २९ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये तापसी पन्नूची कथा दाखवण्यात आली आहे. तापसी राणीच्या भूमिकेत दिसत असून तिने रिशू म्हणजेच विक्रांत मेस्सीशी लग्न केले आहे. पण एका ब्लास्टमध्ये विक्रांतचे निधन होते. विक्रांतचे निधन कसे झाले याचा तपास ‘CID’मधील अभिनेता आदित्य श्रीवास्तव घेत असतो. तपासादरम्यान तापसीचे हर्षवर्धनसोबत अफेअर असल्याचे समोर येते. ‘हसीन दिलरुबा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहाता एकंदरीत चित्रपटाची कथा ही रंजक असणार हे दिसत आहे. सध्या हा ट्रेलर सोशल मीडियावर चर्चेत आहे.

आणखी वाचा : मालिका सोडल्यानंतर ‘तारक मेहता…’मधील अंजली भाभी काय करते? जाणून घ्या

‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटात तापसी, विक्रांत आणि हर्षवर्धन यांचा लव्ह ट्रँगल दाखवण्यात आला आहेत. तसेच तापसीने चित्रपटात काही बोल्ड सीन दिले असल्याचे दिसत आहे. त्यामुळे तापसीला एका वेगळ्या अंदाजात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

‘हसीन दिलरुबा’ हा एक मिस्ट्री थ्रिलर आहे. येत्या २ जुलै रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विनील मॅथ्यू यांनी केले आहे. आनंद एल राय आणि हिमांशु शर्मा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 1:58 pm

Web Title: haseen dillruba trailer taapsee pannu vikrant massey harshvardhan rane love triangle avb 95
Next Stories
1 Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूतचा रुममेट सिद्धार्थने लग्नासाठी केली जामिनाची मागणी
2 कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवरमधला वाद मिटला, पुन्हा शोमध्ये दिसणार एकत्र?
3 Dilip Kumar Health Update: ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना आज मिळणार रुग्णालयातून डिस्चार्ज
Just Now!
X