28 November 2020

News Flash

Haseena first look : श्रद्धाच्या ‘हसीना- द क्वीन ऑफ मुंबई’ चा पहिला पोस्टर

श्रद्धाचा नीडर लूक पाहावयास मिळत आहे.

श्रद्धा कपूर हिने तिच्या आगामी ‘हसीना- द क्वीन ऑफ मुंबई’ चित्रपटातील तिचा लूक सोशल मिडीयावर शेअर केला आहे.

बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने तिच्या आगामी ‘हसीना- द क्वीन ऑफ मुंबई’ चित्रपटातील तिचा लूक सोशल मिडीयावर शेअर केला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेली दाऊदची बहिण हसीना पारकर हिच्यावर चित्रपट काढण्यात येत आहे. दक्षिण मुंबईतील दाऊदची बेनामी मालमत्ता सांभाळणाऱ्या हसीना हिचा ‘दाऊदची बहीण’ म्हणून दबदबा होता़. नागपाडा येथील आलिशान ‘गॉर्डन हाऊस’मध्ये वास्तव्याला असलेल्या हसीनाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. ती दाऊदच्या सर्वात जवळ होती. तसेच, तिची जीवनकथाही रंजक असल्याने दिग्दर्शक अपूर्व लाखिया तिच्या जीवनावर ‘हसीना- द क्वीन ऑफ मुंबई’ हा चित्रपट काढत आहे. या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर ही हसीना पारकरची भूमिका साकारत आहे.

‘हसीना- द क्वीन ऑफ मुंबई’चा पहिला पोस्टर आला असून, त्यावर श्रद्धाचा नीडर लूक पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे, रुपेरी पडद्यावर आजवर आपण पाहिलेली श्रद्धा आणि या पोस्टरवरील श्रद्धा पूर्णपणे वेगळी आहे. तिचा कधीही न पाहिलेला आणि पूर्णपणे वेगळा लूक यात दिसत आहे. चित्रपटात हसीना पारकरचा १७ ते ४० या वयातील जीवनप्रवास दाखविण्यात येणार आहे. फक्त हा चित्रपट करताना श्रद्धाच्या मनात एकच खंत आहे. हसीना पारकरचा मृत्यू २०१४ साली झाला आणि श्रद्धाला कधीच तिला भेटण्याची संधी मिळालेली नाही.

नुकतीच श्रद्धा ही मनी रत्नमच्या ‘ओके कनमानी’चा हिंदी रिमेक असलेल्या ‘ओके जानू’ या चित्रपटात झळकली होती. यात तिच्यासोबत आदित्य रॉय कपूरने मुख्य भूमिका साकारली होती. ‘हसीना- द क्वीन ऑफ मुंबई’ चित्रपटातील भूमिकेविषयी श्रद्धा म्हणाली की, सदर भूमिकेबदद्ल मी उत्सुक आहे, पण मी अधिक चिंताग्रस्तदेखील आहे. कारण, मला यात मला १७ पासून ते ४३ वर्षांपर्यंतच्या स्त्रिची भूमिका साकारायची आहे. तिचा पूर्ण जीवनप्रवास यात आहे. ही व्यक्तिरेखा खूप कठीण आहे. दिग्दर्शक अपूर्व लाखिया दिग्दर्शित ‘हसीना- द क्वीन ऑफ मुंबई’ मध्ये श्रद्धाचा भाऊ सिद्धांत हादेखील आहे. तो यात दाऊद इब्राहिमची भूमिका साकारत असून हा चित्रपट येत्या १४ जुलैला प्रदर्शित होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2017 11:00 am

Web Title: haseena the queen of mumbai haseena first look shraddha kapoor stuns as dawood ibrahims sister
Next Stories
1 या महिन्यात पाहता येणार बहुविध चित्रपटांचा नजराणा
2 ‘संजय दत्तच्या चुकांमधून तरुणाईला खूप काही शिकण्यासारखे’
3 मुलाचा जन्म झाल्यावर अमिताभ यांनी नर्सला पाजली होती शॅम्पेन
Just Now!
X