News Flash

अडल्ट फिल्म पाहात असताना मावशी आली अन्…; विक्रांत मेस्सीने सांगितला किस्सा

विक्रांतने एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे.

vikrant massey watching adult film, vikrant massey news, Vikrant massey film Haseen Dillruba, vikrant massey and cousins watching adult film, Vikrant Massey,
विक्रांतने आरजे सिद्धार्थ कननला नुकतीच मुलाखत दिली.

सध्या अभिनेता विक्रांत मेस्सी आणि अभिनेत्री तापसी पन्नूचा ‘हसीन दिलरुबा’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चर्चेत होता. चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी विक्रांत मेस्सीने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला. दरम्यान त्याने एकदा अडल्ट फिल्म पाहात असताना मावशीने पकडले असल्याचे सांगितले आहे.

विक्रांतने आरजे सिद्धार्थ कननला नुकतीच मुलाखत दिली. दरम्यान त्याने एक किस्सा सांगितला आहे. ‘मी माझ्या आजीकडे राहायला गेलो होते. तेव्हा तेथे माझे चुलत भाऊ देखील आले होते. आम्ही एकदा अडल्ट फिल्म पाहात होतो आणि तेवढ्यात मावशी तेथे आली. आम्ही कधी विचारही केला नव्हता की मावशी सकाळी ३ वाजता उठेल आणि आमच्या खोलीमध्ये येईल. त्यानंतर आम्हाला इतकी लाज वाटली की आम्ही तेथून निघून गेलो’ असे विक्रांत म्हणाला.

आणखी वाचा : ‘तापसीसोबत इंटिमेट सीन शूट करताना…’, हर्षवर्धन राणेने सांगितला अनुभव

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikrant Massey (@vikrantmassey)

पुढे तो म्हणाला, ‘घरात असताना जेव्हा जेव्हा मावशी समोर यायची तेव्हा मला तिच्याकडे बघताना लाज वाटायची. मावशीने माझ्या आईला कधीही याबाबत सांगितले नाही.’

‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटात तापसी, विक्रांत आणि हर्षवर्धन यांचा लव्ह ट्रँगल दाखवण्यात आला आहेत. तसेच तापसीने चित्रपटात काही बोल्ड सीन दिले असल्याचे दिसत आहे. त्यामुळे तापसीला एका वेगळ्या अंदाजात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ‘हसीन दिलरुबा’ हा एक मिस्ट्री थ्रिलर आहे. येत्या २ जुलै रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विनील मॅथ्यू यांनी केले आहे. आनंद एल राय आणि हिमांशु शर्मा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2021 6:30 pm

Web Title: hasin dilruba fem vikrant massey reveals his embarrassing moment while watching adult film avb 95
Next Stories
1 अनुष्का शर्मा-विराट कोहलीचे लग्नाआधीचे अनसीन फोटोज व्हायरल
2 सासू जिंकणार की सून? जाव आणि नणंदेचीही जुगलबंदी; आदेश भावोजी देणार मनोरंजनाची लस
3 सगळीकडे ट्राय का करतोस? केआरकेने रणबीर कपूरच्या चारित्र्यावर केला प्रश्न
Just Now!
X