18 March 2019

News Flash

‘हेट स्टोरी २’ फेम अभिनेत्री लवकरच होणार आई

सुरवीनने दोन वर्षांपर्यंत तिच्या लग्नाची बातमी लपवून ठेवली होती.

सुरवीन चावला

‘हेट स्टोरी २’ फेम अभिनेत्री सुरवीन चावलाच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. इन्स्टाग्राम पोस्टद्वारे तिने चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. सुरवीनने दोन वर्षांपूर्वी व्यावसायिक अक्षय ठक्करशी लग्न केलं होतं. मात्र दोन वर्षांपर्यंत तिने ही बातमी लपवून ठेवली होती. गेल्या वर्षांच्या अखेरीस तिने विवाहित असल्याचा खुलासा केला.

सुरवीनने इन्स्टाग्रामवर तिच्या प्रेग्नंसीसंदर्भात एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये पतीसोबतचा फोटो आणि त्याच्यासमोर बाळाचे जोडे ठेवलेले दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने गरोदर असल्याचं म्हटलं आहे.

सुरवीनने २८ जुलै २०१५ मध्ये अक्षयशी इटलीमध्ये लग्न केले. सुरवीन आणि अक्षयची भेट २०१३ मध्ये एका मित्राकरवी झाली. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात होऊन दोघांनी २०१५ मध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नात हातावर मोजता येतील एवढीच जवळची माणसं उपस्थित होती. अक्षय ठक्कर व्यावसायिक आहे. सुरवीनआधी कोणीही तिच्या लग्नाची घोषणा करणार नाही याची पुरेपूर काळजी तिने घेतली होती. सुरवीनच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर सुरवीनने ‘पार्च्ड’, ‘अगली’ आणि ‘हेट स्टोरी २’ सिनेमांत काम केले आहे. तिने अनेक लघुपट आणि म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे.

First Published on November 8, 2018 5:50 pm

Web Title: hate story 2 fame actress surveen chawla announces her pregnancy