News Flash

‘हेट स्टोरी २’ फेम अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन

या अभिनेत्रीने दोन वर्षांपूर्वी व्यावसायिक अक्षय ठक्करशी लग्न केलं. मात्र दोन वर्षांपर्यंत तिने ही बातमी लपवून ठेवली होती.

इन्स्टाग्राम पोस्टद्वारे तिने चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे.

‘हेट स्टोरी २’ फेम अभिनेत्री सुरवीन चावलाच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. इन्स्टाग्राम पोस्टद्वारे तिने चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. सुरवीनने दोन वर्षांपूर्वी व्यावसायिक अक्षय ठक्करशी लग्न केलं. मात्र दोन वर्षांपर्यंत तिने ही बातमी लपवून ठेवली होती. गेल्या वर्षाच्या अखेरीस तिने विवाहित असल्याचा खुलासा केला.

‘माझ्या छोट्या कुटुंबात तिच्या येण्यामुळे आनंदाचं वातावरण पसरलं आहे,’ असं कॅप्शन देत सुरवीनने फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये बाळाचे पाय पाहायला मिळत आहेत. त्याचसोबतच तिने मुलीचं नावसुद्धा सांगितलं आहे. या चिमुकल्या पाहुणीचं नाव ‘इवा’ ठेवल्याचं तिने इन्स्टाग्रामवर सांगितलं आहे.

सुरवीनने २८ जुलै २०१५ मध्ये अक्षयशी इटलीमध्ये लग्न केले. सुरवीन आणि अक्षयची भेट २०१३ मध्ये एका मित्राकरवी झाली. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात होऊन दोघांनी २०१५ मध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नात हातावर मोजता येतील एवढीच जवळची माणसं उपस्थित होती. अक्षय ठक्कर व्यावसायिक आहे. सुरवीनआधी कोणीही तिच्या लग्नाची घोषणा करणार नाही याची पुरेपूर काळजी तिने घेतली होती. सुरवीनच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर सुरवीनने ‘पार्च्ड’, ‘अगली’ आणि ‘हेट स्टोरी २’ सिनेमांत काम केले आहे. तिने अनेक लघुपट आणि म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 12:26 pm

Web Title: hate story 2 fame surveen chawla shares first picture of her baby girl eva
Next Stories
1 मोदींवर टीका करताना मॉर्फ फोटोचा वापर, कॉमेडियन कुणाल कामरावर कायदेशीर कारवाई?
2 विकी कौशलला शूटिंगदरम्यान दुखापत, पडले १३ टाके
3 चित्र रंजन : बडा घर पोकळ वासा..
Just Now!
X