13 December 2018

News Flash

हनीमूनला गेलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावे लागले एअरलिफ्ट!

स्वित्झर्लंडमध्ये जोरदार हिमवृष्टी सुरु झाल्यामुळे दोघांचीही प्रकृती बिघडली.

पाओली दाम

‘हेट स्टोरी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रसिद्धीस आलेली बंगाली अभिनेत्री पाओली दाम हिने गेल्याच महिन्यात लग्न केले. ‘हेट स्टोरी’त पाओलीने दिलेल्या अतिशय बोल्ड दृश्यांची तेव्हा बरीच चर्चा झाली होती. हीच अभिनेत्री आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी ती तिच्या बोल्ड सीनमुळे नव्हे तर तिच्या हनीमूनमुळे सर्वांच्या चर्चेचा विषय झाली आहे.

वाचा : आणखी एक मराठी सेलिब्रिटी जोडी अडकली विवाहबंधनात

लग्नानंतर पाओली आणि तिचा पती अर्जुन हनीमूनसाठी स्वित्झर्लंडला गेले होते. मात्र, त्यादरम्यान त्यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, स्वित्झर्लंडमध्ये जोरदार हिमवृष्टी सुरु झाल्यामुळे दोघांचीही प्रकृती बिघडली. तसेच हिमवृष्टीमुळे ते कुणाशीही संपर्कही करु शकत नव्हते. रेल्वे ट्रॅक आणि रस्तेही बंद झाले होते. हवामानात झालेल्या बदलामुळे पाओलीची प्रकृती जास्तच खराब झाली. त्यामुळे हेलिकॉप्टरच्या मदतीने दोघांनाही रिसॉर्टमधून बाहेर काढण्यात आले. तसेच इतरही पर्यटकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. सध्या सर्वाची प्रकृती स्थिर असून ते सुरक्षित ठिकाणी आहेत.

वाचा : चाहतीवर भडकले ऋषी कपूर, रणबीरने सावरला प्रसंग

पाओलीने गेल्या महिन्यात ४ डिसेंबरला गुवाहाटीतील रेस्तराँ मालक अर्जुन देबसोबत लग्न केले. बंगाली परंपरेनुसार या दोघांचा विवाहसोहळा पार पडला होता. या लग्नसमारंभासाठी दोघांचेही जवळचे नातेवाईक उपस्थित होते.

First Published on January 12, 2018 11:17 am

Web Title: hate story fame actress paoli dam and husband safely evacuated from swiss resort amidst avalanche fears