उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीचा दोन आठवड्यानंतर उपचारांदरम्यान मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. या अमानुष घटनेवर अभिनेत्री स्वरा भास्कर हिने प्रतिक्रिया दिली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा व तिथे राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी तिने केली आहे.

अवश्य पाहा – ‘म्हातारी’ म्हणून चिडवणाऱ्या ट्रोलर्सवर अभिनेत्री संतापली; दिली कायदेशीर कारवाईची धमकी

स्वरा भास्कर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती रोखठोक प्रतिक्रिया देते. यावेळी तिने हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. “योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा देण्याची वेळ आता आली आहे. त्यांच्या कार्यकालावधीत उत्तर प्रदेशमधील कायदा सुव्यवस्था हळूहळू नष्ट होत आहे. हाथरसमधील दुदैवी घटना हे त्याचंच उदाहरण आहे. युपीमध्ये गँग वॉर होतात. बलात्कार होतात. युपी दिवसेंदिवस असुरक्षित होत चाललं आहे. त्यामुळे तिथे राष्ट्रपती राजवट लागू करावी.” अशा आशयाचं ट्विट करुन स्वरा भास्कर हिने आपला संताप व्यक्त केला आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – सुशांत मृत्यू प्रकरणावर येतोय चित्रपट; ही अभिनेत्री साकारणार रिया चक्रवर्तीची भूमिका

दिल्लीतील निर्भया प्रकरणासारखे हे प्रकरण असून यात चार तरुणांनी एका तरूणीवर बलात्कार करुन, तिची जीभ छाटून तिची मान मोडल्याचा अत्यंत संतापजनक व अमानुष प्रकार घडला आहे. यामुळे अत्यंत गंभीर स्थितीत असलेल्या या तरुणीची दोन आठवड्यांपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर २९ सप्टेंबर रोजी तिची प्राणज्योत मालवली.