News Flash

युपी पोलिसांनी राहुल गांधींवर केलेल्या लाठीचार्जवर स्वरा भास्कर संतापली, म्हणाली…

पोलिसांनी पकडली राहुल गांधींची कॉलर, लाठीचार्ज करुन खाली जमिनीवर पाडलं

काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या विरोधात महामारी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील इकोटेक पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यासह १५३ कार्यकर्ते आणि ५० इतर लोकांवर १५५/२०२०, १८८, २६९, २७० आयपीसी आणि ३ महामारी अ‍ॅक्ट अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईवर अभिनेत्री स्वरा भास्कर हिने संताप व्यक्त केला आहे. “शाबाश राहुल गांधी” अशा आशयाचं ट्विट करुन तिने काँग्रेसचं कौतुक केलं आहे. सोबतच तिने राहुल गांधी यांनी केलेल्या आंदोलनाचा एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.

अवश्य पाहा – बिग बॉस १४ मध्ये झळकणार ग्लॅमरस पवित्रा; ७ दिवसांसाठी मिळणार लाखो रुपयांचं मानधन

अवश्य पाहा – “प्यार एक धोका हैं…” अभिनेत्रीला प्रियकराने फसवलं: दुसऱ्याच तरुणीबरोबर केलं लग्न

गुरुवारी दुपारी हाथरस येथील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधी यांनी लाँग मार्च काढला होता. मात्र या दरम्यान राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप होतो आहे. तर प्रियंका गांधी यांना पोलिसांनी कुटुंबीयांना भेटण्यापासून रोखल्याचा आरोप होतो आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस या ठिकाणी करोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लोकांनी गर्दी करण्यास मनाई करण्यात आलेली होती. तसंच सीमेवर बॅरिकेड्सही लावण्यात आले होते. तरीही काँग्रेस नेत्यांनी एपॅडेमिक अॅक्टचं उल्लंघन केलं. त्यामुळे त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 11:51 am

Web Title: hathras rape case rahul gandhi priyanka gandhi swara bhaskar mppg 94
Next Stories
1 महात्मा गांधीजींनी पाहिलेला एकमेव सिनेमा कोणता, माहित आहे का?
2 ‘मी सेलिब्रिटी नाही,तर..’; ट्रोल होण्याविषयी दिलजीत दोसांज व्यक्त
3 अक्षयच्या ‘बेल बॉटम’नं केली कमाल; प्रदर्शनाआधीच केला हा विक्रम
Just Now!
X