News Flash

‘या’ कारणामुळे प्रियांका- निकच्या लग्नाची तारीख पुढे ढकलली

निक आणि प्रियांकाच २ डिसेंबर रोजी जोधपूरमध्ये लग्न होणार होतं.

प्रियांका- निक जोनास

‘क्वांटिको गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ऑगस्ट महिन्यात या दोघांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर पुढील महिन्यात हे दोघं लग्न करणार असल्याची चर्चा रंगली होती. परंतु आता त्यांच्या लग्नाच्या तारेख बदल झाल्याचं समोर आलं आहे.

‘पिंकव्हिला’नुसार, निक आणि प्रियांका यांचं पुढील महिन्यात ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीमध्ये जोधपूरमध्ये लग्न होणार होतं. परंतु, आता त्यांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली असून १४-१५ जानेवारी रोजी ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे.

दरम्यान, कामाच्या व्यस्त शेड्युलमुळे निक आणि प्रियांकाने लग्नाची तारीख पुढे ढकलल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु या दोघांच्याही घरातल्यांनी लग्नाच्या खरेदीसाठी सुरुवात केली आहे. प्रियांकानेही तिती खरेदी सुरु केली असून तिने काही दिवसापूर्वी डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांची भेट घेतली होती. त्यामुळे प्रियांका अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेला लेहंगा परिधान करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 2:05 pm

Web Title: have priyanka chopra and nick jonas postponed their wedding date
Next Stories
1 ‘नागिन २’मधील ही अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ
2 #MeToo : ‘सेक्रेड गेम्स’च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप
3 #MeToo : दिग्दर्शक मुकेश छाबडाला दणका, फॉक्स स्टारकडून करार रद्द
Just Now!
X