अभिनेत्री, मॉडेल हेजल किचने दोन वर्षापूर्वी क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत लग्नगाठ बांधली. गोव्यात एका पार्टीमध्ये या दोघांची ओळख झाली आणि या ओळखीचं प्रेमात रुपांतर झालं. त्यानंतर ३० नोव्हेंबर २०१६ रोजी या दोघांनी लग्न केलं. त्यातच आता सुखाने सुरु असलेल्या त्यांच्या संसारवेलीवर एक चिमुकलं फूल उमलणार आहे. हेजल प्रेग्नेंट असून त्यांच्या घरी लवकरच एका नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलीचा इशाचा लग्नसोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यामध्ये क्रीडाविश्वापासून ते कलाविश्वापर्यंत आणि देशासह विदेशातील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. त्यात युवराज आणि हेजलही उपस्थित होते. यावेळी हेजल तिचं पोट लपविण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती. त्यातच काही जण या दोघांना शुभेच्छाही देत असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे हेजल प्रेग्नंट असल्याचं ‘बॉलिवूड लाईफ’ने म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

#yuvrajsingh and #hazelkeech at #ishaambani #anandpiramal #wedding #mumbai #india

A post shared by Ajit Andia (@ajitandia) on

दरम्यान, या वृत्ताला हेजल किंवा युवराजकडून अद्यापही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे युवराज ही गोड बातमी चाहत्यांसोबत कधी शेअर करणार याकडे साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. हेजल ही एक ब्रिटीश अभिनेत्री असून अभिनेता सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटात तिने महत्वाची भूमिका वठविली होती. त्याप्रमाणेच ‘बिग बॉस-७’, ‘झलक दिखला जा’ आणि ‘कॉमेडी सर्कस’ अशा अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्येही तिने सहभाग घेतला होता.