News Flash

प्रीतीने दाखल केलेला विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी नेस वाडिया न्यायालयात

उद्योगपती नेस वाडिया यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे

मुंबई : विनयभंग केल्याच्या आरोपप्रकरणी अभिनेत्री प्रीती झिंटा हिने केलेल्या तक्रारीच्या पाश्र्वभूमीवर दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी उद्योगपती नेस वाडिया यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच आमच्या दोघांमध्ये जे काही घडले ते सगळे मागे सोडून द्यायचे आहे, असेही वाडिया यांनी बुधवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी सांगितले. त्यानंतर न्यायालयाने वाडिया यांच्या याचिकेवर प्रीती झिंटा हिला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2018 12:16 pm

Web Title: hc directs preity zinta to reply to ness wadias plea
Next Stories
1 नऊ किलो सोनं चोरणाऱ्या मराठी चित्रपट निर्मात्याला अटक
2 बायोपिकमध्ये भूमिका साकारल्यानंतर अजूनही मानसिक तणावात – सनी लिओनी
3 प्रियांकाऐवजी कतरिनाचीच निवड ‘भारत’साठी योग्य होती कारण…..
Just Now!
X