News Flash

एआयबी नॉकआउट शो : दीपिकाला न्यायालयाचा दिलासा

अश्लीलता आणि बीभत्सतेच्या कारणावरून सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या एआयबी नॉकआउट या कार्यक्रमात सहभागी झाल्याप्रकरणी

| March 7, 2015 01:04 am

अश्लीलता आणि बीभत्सतेच्या कारणावरून सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या एआयबी नॉकआउट या कार्यक्रमात सहभागी झाल्याप्रकरणी आपल्याविरोधातील गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी अभिनेत्री दीपिका पदुकोण हिनेही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने तिच्या याचिकेवरील सुनावणी १६ मार्चपर्यंत ठेवून तोपर्यंत तिला अटक करू नये, असे आदेश पोलिसांना दिले आहेत.
याच संदर्भात निर्माता करण जोहर याच्या याचिकेवरही १६ मार्च रोजीच सुनावणी होणार आहे. सामाजिक कार्यकत्रे संतोष दौंडकर यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत गिरगाव न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर ताडदेव पोलिसांनी कार्यक्रमाचे आयोजक आणि यात सहभागी झालेला करण जोहर,  अर्जुन कपूर, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, आलिया भट यांच्यासह १४ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2015 1:04 am

Web Title: hc relief for actor deepika padukone in fir against aib show
टॅग : Deepika Padukone
Next Stories
1 व्हॉट अबाऊट सावरकर?’च्या टीमची अनोखी होळी
2 “जाऊंद्या ना बाळासाहेब”चा धुमधडाक्यात मुहूर्त!!
3 सई ताम्हणकर प्रथमच ग्रामीण ढंगात
Just Now!
X