News Flash

‘हे मन बावरे’मधील अभिनेत्याने केले दुसऱ्यांदा लग्न

जाणून घ्या त्याच्या पत्नीविषयी..

सध्या अनेक कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसत आहे. अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत, अभिनेत्री अभिज्ञा भावे, सिद्धार्थ चांदेकर, अस्ताद काळे यांच्या पाठोपाठ ‘हे मन बावरे’ मालिकेतील अभिनेता संग्राम समेळ आता दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाले आहेत.

संग्रामने डान्सर श्रद्धा फाटकशी लग्न केले आहे. इचलकरंजी येथे त्यांचा विवाहसोहळा पार पाडला. त्यांच्या लग्नासोहळ्याला काही मोजक्याच लोकांनी हजेरी लावली होती. आता लग्नसोहळ्यातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rishikesh Shah (@rishiyshah)

संग्रामने २०१६मध्ये अभिनेत्री पल्लवी पाटीलशी लग्न केले होते. पल्लवीने ‘रुंजी’ या मालिकेत काम केले. संग्राम आणि पल्लवीचा संसार फार काळ टिकला नाही. त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता संग्रामने श्रद्धासोबत पुन्हा नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rishikesh Shah (@rishiyshah)

संग्रामने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण करिअरची सुरुवात त्याने नाटकापासून केली आहे. त्याने ‘पुढचं पाऊल’ या मालिकेत काम केले आहे. या मालिकेतील समीरच्या भूमिकेने त्याला ओळख मिळवून दिली. तसेच स्टार प्रवाहवरील ‘ललित २०५’ या मालिकेतही काम केले होते. या मालिकेत त्याने राजाध्यक्षची भूमिका साकारली होती. त्याने ‘हे मन बावरे’ या मालिकेत देखील काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2021 11:18 am

Web Title: he man baware actor samrat samel get married second time avb 95
Next Stories
1 करोनाचं संकट असूनही जान्हवी करतेय प्रमोशन, कारण..
2 ‘बाफ्टा’ पुरस्कारांमध्ये आदर्श गौरवला नामांकन, प्रियांका चोप्राने दिल्या शुभेच्छा
3 बाळासोबत वरुणची धमाल, अरुणाचल प्रदेशमधील चिमुकल्यासोबत फोटो शेअर
Just Now!
X