News Flash

सुशांत नैराश्यामध्ये जाणारा व्यक्ती नाही- अंकिता लोखंडेचा मोठा खुलासा

तिने एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी त्याची कथित प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांत सिंहच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पाटणा सेंट्रल झोनचे महानिरीक्षक संजय सिंग यांनी दिली आहे. रिया चक्रवर्तीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता यासर्वांवर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने वक्तव्य केले आहे.

अंकिताने नुकताच ‘रिपब्लिक टीव्ही’ला मुलाखत दिली. यामुलाखतीमध्ये तिने सुशांत संबंधी अनेक गोष्टींची माहिती दिली. सुशांतला डायरी लिहिण्याची सवय होती. तसेच तो या डायरीमध्ये त्याच्या पुढच्या पाच वर्षांचे प्लॅन लिहून ठेवत असे. तसेच तिने सुशांतला सर्वजण नैराश्यामध्ये असलेल्या मुलापेक्षा एक हिरो म्हणून काय लक्षात ठेवतील असे देखील म्हटले आहे.

सुशांत एक साधा मुलगा होता. छोट्या गावातून आलेला. त्याने इंडस्ट्रीमध्ये चांगले नाव कमावले होते असे अंकिता म्हणाली. आतापर्यंत मी त्याला जितकं ओळखते त्यावरून इतकं सांगते की, तो नैराश्यामध्ये जाणारा व्यक्ती नव्हता. त्याच्या विषयी बायपोलर किंवा नैराश्यात असलेला मुलगा हे शब्द वापरणे चुकीचे ठरेल असे अंकिता पुढे म्हणाली. सुशांतच्या वडिलांनी सुशांतला शेती करायची असल्याचे म्हटले होते. हे खरं आहे सांगत ती म्हणाली, सुशांतला शॉर्ट फिल्म देखील तयार करायच्या होत्या.

यापूर्वी अंकिताने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये तिने ‘सत्याचा विजय होतो’ असे म्हटले होते. अंकिताच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्स केल्या होत्या. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर काही गंभीर आरोप केले असून पाटणा येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी तक्रारीत रिया चक्रवर्तीने सुशांतकडून पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. तसंच सुशांतला धमक्या दिल्याचंही म्हटलं आहे. सुशांत आणि रिया रिलेशनशिपमध्ये होते.

सुशांतच्या वडिलांनी रियावर केलेले आरोप :

तक्रारीत सुशांतच्या वडिलांनी केलेल्या आरोपानुसार, “माझ्या मुलाला सर्व काही सोडून केरळला जाऊन आपल्या मित्रासोबत शेती करण्याची इच्छा होती. पण रियाने त्याला रोखलं. आपलं ऐकलं नाही तर मेडिकल रिपोर्ट मीडियामध्ये प्रसिद्ध करणार आणि मानसिक स्थिती योग्य नसल्याचं सांगणार अशी धमकी तिने दिली होती. जेव्हा सुशांत आपलं ऐकत नसल्याचं आणि त्याच्या बँक खात्यात पैसे नसल्याचं लक्षात आलं तेव्हा रियाने आता त्याचा काही उपयोग नाही असा विचार केला”.

पुढे त्यांनी सांगितलं आहे की, “रिया सुशांतसोबत एकत्र राहत होती. आत्महत्येच्या सहा दिवसांपूर्वी तिने घर सोडताना घरातील रोख रक्कम, दागिने, लॅपटॉप, क्रेडिट कार्ड आणि सुशांतच्या वैद्यकीय सूचनांची कागदपत्रं सोबत नेली. यानंतर रियाने सुशांतचा नंबर ब्लॉक केला. सुशांतने आपल्या बहिणीला फोन करुन रियापासून धोका असल्याचं सांगितलं होतं. रियाने आपल्याला धमकावलं असून वैद्यकीय अहवाल प्रसिद्ध करण्याची धमकी दिल्याचं सुशांतने आपल्या बहिणीला सांगितलं होतं”.

“सुशांतची मॅनेजर दिशाने आत्महत्या केल्यानंतर मीडियामधील बातम्यांमुळे सुशांतला भीती वाटू लागली होती. त्याने रियाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तिने नंबर ब्लॉक केला होता. दिशाच्या आत्महत्येसाठी रिया आपल्याला जबाबदार ठरवेल अशी भीती सुशांतला होती,” असंही त्यांनी तक्रारीत सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 10:49 am

Web Title: he was not a depressed guy said by anikta lokhande about sushant singh rajput avb 95
Next Stories
1 Birthday Special : कियाराच्या ‘या’ छोट्या बॅगची किंमत माहितीये का ?
2 गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी अभिनेत्याने PPE किट घालून केला ३० तास प्रवास
3 ‘लस्ट स्टोरीज’, ‘कबीर सिंग’मुळे कियारा झाली ‘मालामाल’; एवढ्या संपत्तीची आहे मालकीण
Just Now!
X