News Flash

अभिनयासोबत या चित्रपटात आलिया गातानाही दिसणार?

आलियाच्या आवाजातील 'समझावा अनप्लग्ड' या गाण्याला तुफान प्रतिसाद मिळाला होता.

अभिनेत्री आलिया भट्ट

आलिया भट्ट आपल्या अभिनयासोबत हळू हळू आपल्या आवाजातील जादू दाखविताना दिसत आहे. आलियाचा हा नवा अंदाज ती आपल्या आगामी ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटातही दाखवून देणार असल्याचे वृत्त आहे. २३ वर्षीय अभिनेत्री या चित्रपटात ह्द्यस्पर्शी गीत गायल्याचे पाहायला मिळणार असल्याची चर्चा सध्या बॉलिवूड वर्तूळात रंगली आहे. एकाचवेळी रोमँटीक, जोषपूर्ण गाण्यांसोबतच सुफी लहेजाचा आविष्कार करीत आपल्या सुरेल गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या अरिजित सिंगच्या आवाजात या चित्रपटातील एक गाणे रेकॉर्ड करण्यात आले आहे. त्यानंतर आता दुसरे गाणे हे आलियाच्या आवाजात लवकरच रेकॉर्ड करण्यात येणार आहे. ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटातील ‘समझावा अनप्लग्ड’ गाण्यातील आलियाच्या आवाजाला मिळालेली लोकप्रियता लक्षात घेऊन ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ चित्रपटातील एका गाण्याला आलिया योग्य न्याय देऊ शकते, असे दिग्दर्शकाला वाटते. आलियाच्या आवाजातील हे गाणे लवकरच चित्रित करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे.

आलियाच्या आवाजातील गाण्यासंदर्भातील चर्चेला दिग्दर्शक शशांक खैतान यांनी दुजोरा दिला असून या गाण्याची संकल्पनेवर काम सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र चित्रपटात गाण्याचा समावेशाबाबत अद्याप काहीही सांगता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. अर्थात आलियाच्या आवाजातील गाण्याची संकल्पना हवी तशी सत्यात उतरली तरच आलिया या चित्रपटात गाताना दिसेल. आलिया भट्ट आणि वरुण धवन यांनी ‘स्टुण्डट ऑफ दि इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सध्याच्या हॉट कपलपैकी एक असणाऱ्या ही जोडी ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटामध्ये देखील दिसली होती. याशिवाय अवॉर्ड्स कार्यक्रमात ते एकत्र नृत्य करताना अनेकदा दिसतात. नुकतीच त्यांनी ड्रीम टीम टूर केली. यातही त्यांनी अनेक गाण्यांवर एकत्र नृत्य केले. ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’च्या माध्यामातून शशांक खैतान या जोडीला पुन्हा एकदा एकत्र आणत आहेत. हा चित्रपट ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’चा सिक्वल आहे. ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ हा चित्रपट मार्च २०१७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

काही दिवसांपूर्वी आलियाने वरुणसोबतचा एक फोटो इन्स्ट्राग्रामवर पोस्ट केला होता. या फोटोला तिने छान कॅप्शनही दिले होते. तिने लिहिले की, ‘प्रेप टाइम फॉर बद्री अ‍ॅण्ड द दुल्हनिया’ नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असणारी आलिया तिच्या फॅन्ससाठी सतत काहीना काही व्हिडिओ आणि फोटोज पोस्ट करत असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 7:43 pm

Web Title: heartbreak song alia bhatt badrinath ki dulhania
Next Stories
1 …म्हणून जॉन, सलमानला सोडून करिना गेली शाहीदकडे
2 सिद्धार्थ मल्होत्राला या गोष्टीची वाटतेय सर्वाधिक भीती…
3 ‘पद्मावती’ चित्रपटात दीपिकाला टक्कर देण्यास ऐश्वर्या सज्ज
Just Now!
X