News Flash

मानधनाच्या बाबतीत हेमा मालिनी यांची दीपिका-प्रियांकाला टक्कर

या वयातही त्यांना मिळणारे मानधन पाहता आताच्या अभिनेत्रींना त्या चांगलीच टक्कर देत असल्याचे दिसते.

चित्रपटसृष्टीत एकेकाळी अभिनेत्रींपेक्षा अभिनेत्यांना अधिक मानधन दिले जायचे. पण, आता अभिनेत्री या मानधनाच्या बाबतीत अभिनेत्यांना टक्कर देताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झालेल्या सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्रींच्या यादीत दीपिका पदुकोणच्या नावात समावेश होता. दीपिकाच्या एका चित्रपटाची कमाई जवळपास १० मिलियन डॉलर इतकी आहे. दुसरीकडे, बॉलीवूडसह हॉलीवूडमध्येही जम बसलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा कमाईच्या बाबतीत अनेकांना टक्कर देताना दिसत आहे. पण, आता ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यादेखील कमाईत बॉलीवूड अभिनेत्रींना टक्कर देण्यास सज्ज झाल्या आहेत.

७०च्या दशकात हेमा मालिनी यांनी बॉलीवूड चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट बॉलीवूडला दिले आहेत. लवकरच हेमा मालिनी या नव्या चित्रपटात दिसणार आहेत. हेमा मालिनी यांना एका चित्रपटात आईची भूमिका साकारण्यासाठी दोन कोटी रुपये मिळाल्याचे वृत्त आहे. त्यांनी स्वीकारलेल्या या मानधनानंतर त्यांचे नावही बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त कमाई करणा-या अभिनेत्रींच्या यादीमध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हेमा मालिनी यांना हे मानधन दाक्षिणात्य चित्रपटासाठी देण्यात आले आहे. पण, महत्त्वाचे हे की बाकीच्या सर्व अभिनेत्री या आताच्या जमान्यातील आहेत. तर हेमा मालिनी यांच्या वयाचा विचार करता या सगळ्यांपेक्षा मोठ्या आहेत. त्यामुळे या वयातही त्यांना मिळणारे मानधन पाहता आताच्या अभिनेत्रींना त्या चांगलीच टक्कर देत असल्याचे दिसते.

दाक्षिणात्य अभिनेता नंदमुरी बालकृष्ण याचा १००वा चित्रपट ‘गौतमीपुत्र सातकर्णी’ मध्ये हेमा मालिनी यांनी आईची भूमिका साकारली असल्याचे कळते. या चित्रपटची निर्मिती साईबाबू जगरलामुदी आणि वाय राजीव रेड्डी यांनी केली असून क्रिशने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अभिनेत्री श्रिया सरन चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 1:01 pm

Web Title: hema malani is going to give a tough fight to todays bollywood actresses
Next Stories
1 ‘फिटनेस गुरू’च्या वाढदिवसाला पोहचले सेलिब्रिटी शिष्य
2 ‘त्या’ अफवांवर अभिषेकने दिला पू्र्णविराम
3 ‘तुमच्या प्रेमावरच मी उभी आहे’
Just Now!
X