20 January 2021

News Flash

हेमा मालिनी- धर्मेंद्र पुन्हा झाले आजी-आजोबा; आहानाने दिला जुळ्या मुलींना जन्म

आहाना आणि वैभव वोहरा यांना डॅरियन हा एक मुलगासुद्धा आहे.

अभिनेते धर्मेंद्र व अभिनेत्री हेमा मालिनी यांची मुलगी आहाना देओल हिने जुळ्या मुलींना जन्म दिला. आहानाने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे ही गोड बातमी चाहत्यांना दिली. ‘अॅस्ट्राइया आणि अदिया वोहरा या जुळ्या मुलींचं २६ नोव्हेंबर रोजी आमच्या घरात आगमन झालं’, असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं होतं. आहाना आणि वैभव वोहरा यांना डॅरियन हा एक मुलगासुद्धा आहे.

आहाना आणि वैभव यांनी २०१४ मध्ये लग्न केलं. गेल्या वर्षी जूनमध्ये आहानाची मोठी बहीण इशा देओलने मुलीला जन्म दिला. इशाला राध्या आणि मिराया या दोन मुली आहेत. आता आहानाने जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर हेमा मालिनी व धर्मेंद्र पुन्हा एकदा आजी-आजोबा झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ahana Deol Vohra (@a_tribe)

हेमा मालिनी यांची मोठी मुलगी इशाने बॉलिवूडमध्ये काम केलं. मात्र आहाना अभिनयापासून दूरच राहिली. मात्र तिने संजय लीला भन्साळी यांच्या ‘गुजारिश’ या चित्रपटासाठी सहाय्यक म्हणून काम केलं होतं. २ फेब्रुवारी २०१४ मध्ये आहानाने व्यावसायिक वैभव वोहराशी लग्न केलं आणि त्यानंतर जून २०१५ मध्ये तिने मुलाला जन्म दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 10:07 am

Web Title: hema malini dharmendra become grandparents again as daughter ahana gives birth to twin girls ssv 92
Next Stories
1 मराठी अभिनेत्रीचा विदेशात डंका; नेहा महाजन-रिकी मार्टिनच्या म्युझिक अल्बमला ‘ग्रॅमी नॉमिनेशन’
2 अभिनेत्री इशा केसकरला पितृशोक
3 कंगनाच्या बंगल्यावरील कारवाई बेकायदा
Just Now!
X