09 August 2020

News Flash

हेमा मालिनींची प्रकृती अस्थिर? इशाने सांगितलं सत्य

'माझी आई...'; इशाने सांगितलं खरं कारण

अभिनेत्री हेमा मालिनी यांची प्रकृती अस्थिर असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली आहे. यावर अभिनेत्री इशा देओलने खुलासा केला आहे. ‘माझी आई व्यवस्थित आहे. कृपया अफवांवर विश्वास ठेऊ नका’, असं इशाने सांगितलं आहे. तिने ट्विट करुन ही माहिती दिली. अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर हेमा मालिनीदेखील आजारी असल्याची चर्चा होऊ लागली होती. त्यावर इशाने स्पष्टीकरण दिलं आहे.

“माझी आई हेमा मालिनी यांची तब्येत ठीक आहे. ती एकदम फिट आणि व्यवस्थित आहे. ती आजाराची असल्याची अफवा होती. अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका. तुम्ही दाखविलेल्या प्रेम आणि काळजीसाठी मनापासून धन्यवाद”, असं ट्विट इशाने केलं आहे.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांना करोना झाल्यानंतर नीतू कपूर आणि रणवीरला करोना झाल्याची अफवा पसरली होती. तसंच हेमा मालिनी यांचीही तब्येत बिघडल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र या दोन्ही अफवा असल्याचं इशा आणि रिधिमाने स्पष्ट केलं आहे. परंतु, आता बिग आणि अभिषेकसह अनुपम खेर यांच्या आईसह तीन जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 12:41 pm

Web Title: hema malini is fine and good esha deol post going viral ssj 93
Next Stories
1 हा चित्रपट पाहून ‘आयर्नमॅन’ झाला बॉलिवूडचा फॅन; करायचंय ‘या’ अभिनेत्यासोबत काम
2 ‘तुम्ही बरे व्हाल, मला विश्वास आहे’; बिग बींसाठी लता मंगेशकर यांचं ट्विट
3 सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सलमानवर संशय? पोलिसांनी केली एक्स मॅनेजरची चौकशी
Just Now!
X