24 September 2020

News Flash

जया बच्चन विरुद्ध कंगना वादात हेमा मालिनींची उडी; म्हणाल्या, “बॉलिवूडबाबत आम्ही…”

कंगनाच्या आरोपांना हेमा मालिनी यांनी दिलं प्रत्युत्तर

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त व्यक्तव्यांमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. महाराष्ट्र सरकार आणि बॉलिवूड सिनेसृष्टीवर ती सातत्याने आरोप करत आहे. या आरोपांमुळे संतापलेल्या अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी कंगनाला चांगलेच खडे बोल सुनावले. त्यांच्या या भूमिकेला अभिनेत्री हेमा मालिनी यांनी पाठिंबा दिला आहे. खोटे आरोप करुन या इंडस्ट्रीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय अशी टीका त्यांनी कंगनावर केली.

अवश्य पाहा – कंगनाने केलं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ट्विट, म्हणाली…

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत हेमा मालिनी यांनी कंगना वादावर प्रतिक्रिया दिली. “नाव, सन्मान, प्रसिद्धी, पैसा सर्वकाही मला याच इंडस्ट्रीने दिलं आहे. बॉलिवूड हे एक सुंदर क्षेत्र आहे. कला आणि संस्कृतीचं योग्य मिलन या उद्योगात होतं. या इंडस्ट्रीने वेळोवेळी समाजाची मदत केली आहे. नेहमीच जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. बॉलिवूड ही भारतातील एक महत्वाची इंडस्ट्री आहे. लाखो लोकांचा रोजगार या इंडस्ट्रीवर आधारित आहे. त्यामुळे बॉलिवूडबाबत असे आरोप आम्ही सहन करु शकत नाही.” अशी प्रतिक्रिया देत हेमा मालिनी यांनी जया बच्चन यांना पाठिंबा दिला.

अवश्य पाहा – “या देशात अल्पसंख्यांक असणं गुन्हा आहे”; उमर खलिदच्या अटकेवर अभिनेता संतापला

यापूर्वी काय म्हणाल्या होत्या जया बच्चन?

राज्यसभेत जया बच्चन म्हणाल्या, “मनोरंजन विश्वातील लोकांना सोशल मीडियावर वाटेल ते बोललं जातंय. ज्यांनी इंडस्ट्रीत राहून नाव कमावलं, तेच आता इंडस्ट्रीला गटार म्हणतायत. माझा याला पूर्ण विरोध आहे. लोकांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये असं सरकारकडून सांगण्यात यावं अशी मी आशा करते. इंडस्ट्रीने नेहमीच चांगल्या उपक्रमांसाठी सरकारला मदत करायला पुढाकार घेतला आहे. आता सरकारने इंडस्ट्रीला पाठिंबा द्यावा. केवळ काही लोकांमुळे संपूर्ण इंडस्ट्रीचं नाव खराब होऊ शकत नाही.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 5:21 pm

Web Title: hema malini jaya bachchan kangana ranaut mppg 94
Next Stories
1 अभिनेत्याच्या कुटुंबीयांना करोनाची लागण, सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती
2 ‘दीदी पँट लूज है’ म्हणणाऱ्या ट्रोलरला अभिनेत्रीचे भन्नाट उत्तर
3 “सुशांतच्या नावाखाली कंगनाने स्वत:साठी Y+ सुरक्षा मिळवली”
Just Now!
X