बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना करोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान बिग बींसोबतच अभिनेत्री हेमा मालिनी यांना देखील करोनाची लागण झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र या चर्चांवर स्वत: हेमा मालिनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अवश्य पाहा – सलमानचं ‘सल्लू’ हे नाव कोणी ठेवलं?; भाईजानने सांगितला आपल्या नावाचा अजब किस्सा

हेमा मालिनी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करुन प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “मला करोनाची लागण झालेली नाही. भगवान श्री कृष्णाच्या कृपेमुळे मी तंदुरुस्त आहे. माझी काळजी करण्यासाठी धन्यवाद.” त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – अमिताभ-कनिका व्यतिरिक्त ‘या’ कलाकारांना झाली करोनाची लागण

अवश्य पाहा – “मी भारतीय असल्यामुळे…”; अभिनेत्रीने सांगितला परदेशातील ‘तो’ धक्कादायक अनुभव

देशभरात पाच लाखांपेक्षा जास्त रुग्णांची करोनावर मात

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव जरी देशात वाढत असला तरी, दिलासादायक बाब म्हणजे करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढतच आहे. देशात सध्याच्या घडीला करोनामुक्त झालेल्या संख्येने पाच लाखांचा टप्पा ओलांडला असून, आतापर्यंत तब्बल ५ लाख १५ हजार ३८५ जणांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

देशातील करोनाबाधितांची संख्या ८ लाखांच्या पुढे गेली आहे. २४ तासांत देशात २७ हजार ११४ नवीन करोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर ५१९ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ८ लाख २० हजार ९१६ झाली आहे. देशात आतापर्यंत २२ हजार १२३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात आणि दिल्लीत मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत.