01 October 2020

News Flash

बिग बींसाठी हेमा मालिनी यांनी केली प्रार्थना; म्हणाल्या…

अमिताभ बच्चन यांना करोना विषाणूची लागण

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना करोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बिग बींनी स्वत: ट्विट करुन याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली. या ट्विटमुळे त्यांचे चाहते चिंतेत आहेत. अभिनेत्री हेमा मालिनी यांनी देखील ट्विटद्वारे बिग बींसाठी प्रार्थना केली आहे.

अवश्य पाहा – सलमानचं ‘सल्लू’ हे नाव कोणी ठेवलं?; भाईजानने सांगितला आपल्या नावाचा अजब किस्सा

अवश्य पाहा – “मी भारतीय असल्यामुळे…”; अभिनेत्रीने सांगितला परदेशातील ‘तो’ धक्कादायक अनुभव

काय म्हणाल्या हेमा मालिनी?

“अमितजी यांना करोना विषाणूची लागण झाली आहे. उपचारासाठी त्यांना नानावटी रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. मी त्यांच्या तंदुरुस्तीसाठी प्रार्थना करत आहे. मला खात्री आहे की आपल्या सर्वांच्या प्रार्थनांमुळे अमितजी सुखरुप घरी परततील.” अशा आशयाचं ट्विट हेमा मालिनी यांनी केलं आहे. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे.

काय म्हटलं होतं अमिताभ बच्चन यांनी?

“माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी रुग्णालयात दाखल झालो आहे. काही चाचण्या आणखीही केल्या जाणार आहेत. मागील दहा दिवसात जे माझ्या संपर्कात आले होते त्यांनीही चाचणी करावी असं आवाहन मी करतो आहे.” अशा आशयाचं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 11:10 am

Web Title: hema malini tweet on amitabh bachchan mppg 94
Next Stories
1 अनुपम खेर यांच्या आईसह कुटुंबातील तीन जणांना करोनाची लागण
2 …म्हणून BMC ने मानले अभिषेकचे आभार
3 बिग बींमध्ये करोनाची सौम्य लक्षणे; नानावटी रुग्णालयाची माहिती
Just Now!
X