News Flash

Royal Wedding : …म्हणून मेगनच्या ब्राइड्समेटच्या यादीतून प्रियांकाला वगळलं?

प्रिंस हॅरी आणि मेगनच्या साखरपुड्याची अधिकृत घोषणा करण्यात आली तेव्हाही प्रियांकाने या दोघांना नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

प्रियांका चोप्रा, मेगन मार्कल

लग्नसराईचे वारे सध्या ब्रिटनच्या राजघराण्यातही वाहत आहेत. प्रिंस हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्कल यांच्या लग्नाचा दिवस आता अगदी जवळ आला असून सोशल मीडिया म्हणून नका किंवा कलाविश्व सर्वत्र याच शाही विवाहसोहळ्याची चर्चा आहे. भारतीयांमध्येही या शाही लग्नाविषयी उत्सुकता पाहायला मिळत आहे आणि त्यामागचं एक कारण म्हणजे अभिनेत्री प्रियांका चोप्रा.

प्रियांका आणि मेगन या एकमेकांच्या खुप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे ही सहाजिकच ही ‘देसी गर्ल’ प्रिंस हॅरी आणि मेगनच्या लग्नाला हजेरी लावणार असल्याचं म्हटलं जात आहे. मुख्य म्हणजे पाहुण्यांच्या यादीत तिचं नावही आहे. पण, मेगनच्या ब्राइड्समेडच्या यादीतून मात्र तिचं नाव वगळण्यात आलं आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मेगनच्या आयुष्यातील या अत्यंत महत्त्वाच्या दिवसासाठी ब्राइड्समेटच्या यादीत प्रिंसेस शार्लेट ऑफ केंब्रिज Princess Charlotte of Cambridge (प्रिंस विलियम आणि केट यांची मुलगी), मिस फ्लोरेन्स वॅन कुट्सेम Miss Florence van Cutsem, मिस झली वॉरन Miss Zalie Warren, मिस रेमी लिट Miss Remi Litt, मिस रिलान लिट Miss Rylan Litt आणि मिस आयवी मुलरोनी Ivy Mulroney यांचा समावेश आहे.

१९ मे रोजी पार पडणाऱ्या या विवाहसोहळ्याकडेच सध्या साऱ्या जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. या विवाहसोहळ्यासाठी मेगनच्या ब्राइड्समेडच्या यादीत तिच्या कोणत्याच मैत्रीणीचं नाव नाहीये. ब्राइड्समेड म्हणून अमूक एका मैत्रीणीच्या नावाला पसंती देत इतर मैत्रीणींना दुखवणं मेगनला पटलं नसल्यामुळेच तिने हा निर्णय घेतल्याचं राजघराण्याशी निगडीत एका व्यक्तीने स्पष्ट केलं आहे. आपल्या मित्रमैत्रीणींसोबत मेगनचं खास नातं आहे, ज्यामुळेच तिने हे पाऊल उचलल्याचं कळत आहे. दरम्यान, प्रियांका आणि मेगनच्या मैत्रीविषयी काहीच वेगळं सांगण्याची गरज नाही.

५९२ तास, ३९,००० विटा आणि ८ कारागीर पाहा कसा उभारला राजमहाल

सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांचे बरेच फोटो पाहायला मिळाले आहेत. ज्यावेळी प्रिंस हॅरी आणि मेगनच्या साखरपुड्याची अधिकृत घोषणा करण्यात आली तेव्हाही प्रियांकाने या दोघांना नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हा आता या शाही विवाहसोहळ्यासाठी प्रियांका कोणत्या अंदाजात जाते, हे पाहणंच औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2018 10:03 am

Web Title: here are all the bridesmaids of actress meghan markle and bollywood actress priyanka chopra is not on the list
Next Stories
1 जवळपास दोन महिन्यांनंतर इरफान आलाय चाहत्यांच्या भेटीला…
2 बॉबी देओलचे झाले बारसे, सलमानने ठेवले ‘हे’ नाव !
3 सोशल मीडिया ट्रोलर्सपासून दूर राहण्यासाठी बिग बी काय करतात माहितीये का?
Just Now!
X