या वर्षभरात अनेक सेलिब्रिटींचा, नामवंत व्यक्तींचा विवाहसोहळा पार पडला. पण वर्षाअखेर संपन्न झालेला एक विवाहसोहळा बऱ्याच कारणांसाठी सर्वांच्या लक्षात राहणार आहे. रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानींची कन्या इशा अंबानीचा लग्नसोहळा राजस्थानमधल्या उदयपूरमध्ये बुधवारी (१२ डिसेंबर) पार पडणार आहे. अर्थात अंबानी कुटुंबातील लग्न म्हटल्यावर राजेशाही थाट असणारच. या विवाहसोहळ्यावर खर्च करण्यात पैसा आणि एकंदर व्यवस्थापन पाहून भल्याभल्यांचे डोळे विस्फारले. मोठमोठ्या सेलिब्रिटींच्या परफॉर्मन्सने नटलेला इशाचा संगीत सोहळा अनेकार्थी लक्षवेधी ठरला. सलमान, शाहरुख, आमिर, ऐश्वर्या, अभिषेक यांसोबतच हिलरी क्लिंटन आणि बेयॉन्से यांसारखे जागतिक स्तरावरील नामवंत व्यक्तीसुद्धा प्री-वेडिंग कार्यक्रमासाठी हजर होते. त्यामुळे सोशल मीडियावरही त्याची जोरदार चर्चा झाली.

किंग खान शाहरूख व करण जोहरने संगीत सेरेमनी होस्ट केली. या संगीत सेरेमनीत इशा व आनंद रोमॅन्टिक डान्स करताना दिसले. अंबानी कुटुंबानेही डान्स केला. केवळ इतकंच नाही तर मुकेश अंबानी व नीता अंबानी हेही बॉलिवूडच्या रोमॅन्टिक गाण्यावर थिरकले. रात्री सहभागी झालेल्या पाहुण्यांसाठी खास कार्निव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. अमेरिकन पॉप स्टार बेयॉन्से या कॉर्निव्हलचं आकर्षण ठरली. या कॉनिर्व्हलमध्ये बेयॉन्सेच्या परफॉर्मन्ससाठी अंबानी कुटुंबाने तब्बल १२ कोटी रूपये मोजले आहेत. शाहरूख खान, सलमान खान, आमिर खान, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन असे अनेक बडे स्टार या कॉर्निव्हलमध्ये स्टेजवर थिरकले. शाहरूखने गौरीसोबत तर ऐश्वर्याने अभिषेकसोबत रोमॅण्टिक डान्स केला.

संगीत सोहळ्यातील सेलिब्रिटींचा डान्स पाहून नेटकऱ्यांच्या कल्पकतेलाही उधाण आलं. पाहा काही भन्नाट मीम्स..

जेव्हा सलमान खान बॅकग्राऊंड डान्सर म्हणून नाचतो..

अभिषेक- ऐश्वर्याचा परफॉर्मन्स पाहून काय वाटतं?

विराट कोहली आणि अश्विन लग्नात नाचण्यासाठी तयारी करताना..

कोणता सेलिब्रिटी या प्री-वेडिंगमध्ये सहभागी होऊ शकला नाही..

प्री-वेडिंग सेरेमनीत देशविदेशातील सुमारे १८०० पाहुणे सहभागी झाले होते. इशा अंबानी आनंद परिमलसोबत लग्नगाठ बांधणार आहे.