मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना म्हणजे रमजान. या महिन्यामध्ये प्रत्येक मुस्लीम बांधव रोजे अर्थात उपवास करतात. पाण्याचा एकही घोट न पिता संपूर्ण दिवस हे बांधव कडक उपवास करतात. त्यामुळे या बांधवांसाठी रमजानचा महिना आणि रमजान ईद हे अत्यंत खास असतं. बॉलिवूडमध्ये प्रत्येक सण, उत्सव यांच्यावर आधारित गाणी असल्याचं पाहायला मिळालं आहे. यात ईदवर आधारितदेखील काही गाणी असल्याचं दिसून येतं चला तर पाहुयात काही खास गाणी –

१. ख्वाजा मेरे ख्वाजा-
‘ख्वाजा मेरे ख्वाजा’ हे गाणं जोधा अकबर या चित्रपटातील आहे. या चित्रपटात अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि हृतिक रोशन हे मुख्य भूमिकेत झळकले असून हा चित्रपट विशेष लोकप्रिय झाला. इतकंच नाही तर चित्रपटाच्या कथानकासोबतच चित्रपटातील गाणीही विशेष लोकप्रिय ठरली.

२. नूर-ए- खुदा –
अभिनेता शाहरुख खान याची मुख्य भूमिका असलेला माय नेम इज खान या चित्रपटातील हे गाणं आहे. या गाण्याला अदनान सामी, शंकर महादेवन आणि श्रेया घोषाल यांचा स्वरसाज लाभलेला आहे.

३. वल्लाह रे वल्लाह –
तीस मार खां या चित्रपटातील हे गाणं आहे. या गाण्यात अक्षय कुमार, कतरिना कैफ आणि सलमान खानझळकळे आहेत.

४. जुम्मे की रात-
कीक या चित्रपटातल्या जुम्मे की रात या गाण्याची तरुणाईमध्ये अफाट क्रेझ आहे. अनेक वेळा लग्न समारंभ किंवा पार्टीमध्ये हे गाणं आवर्जुन लावलं जातं. या गाण्यात सलमान खान आणि जॅकलीन फर्नांडिस झळकले आहेत. हे गाणं लोकप्रिय गायक मिका सिंगने गायलं आहे.

५. मुबारक ईद मुबारक –
२००२ साली प्रदर्शित झालेल्या तुमको ना भूल पाएंगे या चित्रपटातील हे गाणं आहे. यात अभिनेता सलमान खान आणि सुष्मिता सेन झळकले आहेत.

६. अर्जियां-
दिल्ली 6 या चित्रपटातलं हे गाणं आहे. यात सोनम कपूर आणि अभिषेक बच्चन झळकले आहेत. जावेद अली आणि कैलाश खेर यांच्या आवाज हे गाणं स्वरबद्ध झालं आहे.

दरम्यान, या गाण्यांव्यतिरिक्त बॉलिवूडमध्ये अशी अनेक गाणी आहेत जी ईदवर आधारित आहेत.