18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

शाहरुखच्या आर्यनपेक्षा सैफच्या इब्राहिमचीच जास्त चर्चा

काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर इब्राहिम खानचा एक शर्टलेस फोटो व्हायरल झाला होता.

Updated: August 9, 2017 1:28 PM

आर्यन खान, इब्राहिम खान

शाहरुख, सैफ या कलाकारांचा चित्रपटसृष्टीत असलेला वावर आता काहीसा कमी होणार आहे. येत्या काळात नव्या जोमाचे कलाकार आणि त्यांना मिळणारी पसंती, कलाविश्वात तयार होणारी नवी पिढी या धर्तीवर शाहरुख आणि सैफच्या फॅन फॉलोइंगमध्ये काहीशी घट होईल अशीही चिन्ह आहेत. बी- टाऊनमध्ये सध्या चर्चेत असलेल्या या नव्या पिढीमध्ये या कलाकारांच्या मुलांचाही समावेश आहे. सोशल मीडियावरही या दोन्ही कलाकरांच्या मुलांच्या फिमेल फॅन्सचा आकडा वाढत आहे. सैफचा मुलगा इब्राहिम आणि शाहरुखचा मुलगा आर्यन हे ‘सोशल मीडिया सेन्सेशन’ झाले आहेत, असंच म्हणावं लागेल. गेल्या काही महिन्यांपासून आर्यनच्या सोशल मीडियावरील पोस्ट आणि त्याचा एकंदर लूक पाहता शाहरुखची जागा चालवण्यासाठी तो तयार असल्याचं म्हटलं जात होतं. पण, त्याला टक्कर देण्यासाठी सैफचा मुलगा सज्ज झाला आहे.

काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर इब्राहिम खानचा एक शर्टलेस फोटो व्हायरल झाला होता. यामध्ये अंगावर सूर्याचा प्रकाश पडल्यामुळे इब्राहिम आणखीच सुंदर दिसत असून तरुणपणीच्या सैफची झलक त्याच्यात पाहायला मिळाली. तेव्हापासूनच त्याच्याविषयीच्या चर्चांना उधाण आलं. इब्राहिमचे फोटो, त्याचं खासगी आयुष्य या साऱ्याविषयी जाणून घेण्यासाठी बऱ्याच जणांनी किंबहुना बऱ्याच ‘जणींनी’ इंटरनेटचा आधार घेतला. त्यामुळे चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वीच या दोन्ही स्टारकिड्समध्ये एक प्रकारची स्पर्धा पाहायला मिळत आहे.

A post shared by Aryan Khan (@___aryan___) on

इब्राहिम खान आर्यनपेक्षा दोन वर्षांनी लहान आहे. त्यामुळे सध्यातरी तो त्याच्या शिक्षणावरच लक्ष केंद्रित करणार असल्याचं म्हटलं जातंय. तर, आर्यन येत्या काळात शिक्षण पूर्ण करुन बॉलिवूडमध्ये शाहरुखचा वसा पुढे चालवणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. हे दोन्ही खान किड्स चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याला सध्यातरी बराच अवकाश असला तरीही आतापासूनच प्रत्येकाने आपला चाहतावर्ग तयार करण्यात यश मिळवलं आहे असं म्हणायल हरकत नाही.

First Published on August 9, 2017 1:17 pm

Web Title: here is hard luck for shah rukh khans son aryan khan because fans are liking shirtless ibrahim ali khans photo saif ali khan son